वेगळ्या विदर्भासाठी लग्न समारंभात रक्ताक्षरी अभियान

0
21

साकोली,दि.19- वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी तशी जुनीच आहे. जांबुवंतराव यांच्या आंदोलनामुळे तशी धार विदर्भाच्या मागणीला आली असूनही विदर्भ वेगळा होऊ शकला नाही. राजकीय स्वार्थापाई कॉंग्रेस ने विदर्भ तर दिलाच नाही पण त्याच धर्तीवर भाजपा ही दिलेला शब्द पाळत नाही हे लक्षात घेऊन विदर्भ मागणीच्या आंदोलनात श्रीहरी अणे ह्यांनी आपल्या महाधिवक्ता पदाचा राजीनामा देऊन सक्रिय झाले आणि वेगळ्या विदर्भ मागणीला पुन्हा जोम आला.विविध आंदोलने व विदर्भाविषयी माहिती व संघटना बांधणीसाठी विविध शिबिरे घेऊन त्यांनी विदर्भ राज्य आघाडी ह्या पक्षाची स्थापना केली.त्यातच 1 मे रोजी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी रक्ताक्षरी हा कार्यक्रम जाहीर केला. वेगळ्या विदर्भासाठी अवघ्या विदर्भातून 10000 रक्ताक्षरी घेऊन तो पंतप्रधान यांना सुपूर्द करण्यात येणार आहे.या रक्ताक्षरी अभियानाने आत्ता लग्नसमारंभातही आपली छाप सोडण्यास सुरवात केली असून तालुक्यातील गोंडउमरी लहानश्या खेड्यातून प्रवीण डोंगरावर ह्या नवविवाहित दाम्पत्याने आपल्या स्वागत समारंभात रक्ताक्षरी कार्यक्रम घेऊन वेगळ्या विदर्भाची मागणी करून आपल्या संसाराची सुरुवात केली. ह्या नवादाम्पत्याच्या जोडीला वर्हाडी मंडळींनी साथ देऊन विदर्भ राज्य आघाडीचे सचिव राकेश भास्कर यांच्या नेतृत्वात 272 लोकांनी रक्तस्वाक्षरी केली.
विदर्भ राज्य आघाडीचे सचिव नीरज खांदेवाले, राजेश भास्कर व नागपूर शहर अध्यक्ष सनी तेलंग, साकोली वीरा चे दीपक जांभुळकर सुनील जांभुळकर व गोंडउमरी शहर उपाध्यक्ष इरले व इतर कार्यकर्ते ह्यावेळी उपस्थित होते.