झाडे जगविण्यासाठी उन्हाळी सुट्यांना सुट्टी; शिक्षक वाघमारेंच्या स्तुत्यउपक्रम

0
16

सांगली,(berartimes.com)दि.04- मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राला नेहमीच दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो.उन्हाळ्याच्या दिवसात तर या भागात पिण्याच्या पाण्याचेही दु्र्भिक्ष असते.त्यातच शाळेच्या आवारात असो की गावात लावलेल्या झाडांना जगविण्यासाठी पाणी कोण देणार हा प्रश्न नेहमीच उभा असतो.अशा कायम दुष्काळी असलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात 673 वाडीवस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा आजही सुरू आहे.त्यामुळे पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण झाल्याने पिके व झाडासाठी तर दुरच ! पिण्याचे पाणी  मिळणे मुश्किल बनले आहे.त्या परिस्थितीत पांडोझरी येथील बाबरवस्ती शाळेतील उपक्रमशिल सहशिक्षक दिलीप वाघमारे (मुळ गाव – बोळेगाव जिल्हा – नांदेड) यांनी आपल्या उन्हाळ्याच्या सुट्यासुध्दा आपल्या गावात घालविण्याएैवजी वेळ वेळ काढून सर्व विद्यार्थी, पालक व नागरिकांना सोबत घेऊन शाळेच्या परिसरात लावण्यात आलेल्या झाडांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.झाडे जगविण्यासाठी त्यांनी स्तुतीपुर्ण उपक्रम राबविला असून इतर शाळांना प्रेरणा देणारा ठरला आहे.
सांगली जिल्हा परिषदेतंर्गत येत असलेल्या आंसगी तुर्क केंद्रातील पांडोझरी बाबरवस्ती येथे जि.प प्राथमीक शाळा आहे.मराठी इयत्ता 1 ते 4 वर्ग असलेल्या शाळेत 44 विद्यार्थी   शिकत आहेत.शाळेच्या आवारात लिंब,पिंपळ,वड,करंजी, चिंच,नारळ,लिंबू, व इतर जातीची 69 झाडे लावली गेली आहेत.यावेळचा कडक उन्हाळ्यात ही झाडे जिवंत राहावी यासाठी  सध्या उन्हाळी सुट्टी सुरु असतानाही शिक्षक दिलीप वाघमारे यांनी मात्र रविवार व गुरुवार हे दिवस ठरवून  विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शाळेच्या आवारातीलच हातपंपाच्या पाण्याने झाडांना पाणी घालून  जीवदान देण्याचे काम सुरु केले आहे.त्यांच्या या कामाची गावकर्यांनी स्तुती करीत त्यांच्यासोबत दोन दिवस पर्यावरण वाचविण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
शिक्षकांची तळमळ बघून झाडांसाठी मोफत पाणी टॅकर
उमीर करिमसाहब चाँदका या टँकरवाल्यानी एक खेप मोफत  पाणी  दिले आहे. बाहेर पाणी विक्रीचा व्यवहार तेजीत सुरु असतानाही शिक्षक वाघमारे यांची झाडे वाचविण्यासाठीची तळमळ बघून त्यांनी एक टॅकर पाणी झाडांसाठी  निशुल्क देऊन त्यांच्या या कार्यात हातभार लावला आहे.उन्हाळ्याच्या सुट्यापैकी फक्त 8 दिवस आपल्या गावी जाऊन कुटूंबासोबत घालवून परत पुन्हा दिलीप वाघमारे हे शाळेच्या गावी परतून आपल्या पर्यावरण बचाव मोहिमेत सहभागी झाले.त्यांच्या या मोहिमेत शाळेतीलच रोहीत गडदे,सानिका गडदे,लावण्या मोटे,शुभांगी मोटे,हणमंत कोरे, गोट्या बाबर, शुभम मोटे,आरती कोरे,शैलेश कोरे,अक्षरा गडदे,उमेश बाबर,आकाश. गडदे,सागर बाबर,अक्षय गडदे,कोमल गडदे,प्रदीप मोटे,किरण मोटे, ज्योती बाबर,सोनाली कोकरे,आयेशा जमखडीकर,,मायक्का खांडेकर,प्पीतम निगनूरे,सोन्या गडदे,अमिर जमखंडीकर,कृष्णा गडदे हे विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाराम गडदे, केंद्र प्रमुख के.बी.पुजारीआंसगीतुर्क,संरपच सलिमाताई मुल्ला, माजी जि.प अध्यक्ष आणासाहेब गडदे यांचे सु्ध्दा सहकार्य याकामी लाभले आहे. तसेच पालक मलप्पा कोरे,गुलाब गडदे,केरुबा गडदे,मारुती बाबर ,तुकाराम बाबर, तानाजी कोकरे,आंनद मोटे, धर्मा कोकरे , श्वावणकुमार कोरे ,लखन दळवी,,ग्रामसेवक शंकर कोरे, नामदेव पुजारी,रावण बाबर,व अन्य शाळेतील शिक्षक अभिजीत माळगोंडे,चौधरी लक्ष्मण ,नरेंद् गावित, किशोर चलाख यांनीही झाडांना जिवंत ठेवण्यासाठी दररोज आळीपाळीने पाणी घालण्याचे काम शिक्षक वाघमारेसोबत सुरु ठेवले आहे.