युवा भोयर पवार मंच नागपुरची 11 जून रोजी सभा

0
13

नागपूर,दि.04- येथील युवा भोयर पवार मंच नागपुरच्या वतीने ११ जुन  रविवारला सकाळी १० वाजता समाज भवन शीतला माता मंदीर जवळ, सुभाष नगर नागपुर येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेमध्ये २०१७—२०२२ या कालावधीसाठी युवा भोयर पवार मंच कार्यकारणिची निवड करणे, महिला समिती,कुमार समितीसह सर्व समित्यांची निवड करण्यासंबधी चर्चा करण्यात येणार आहे.तर सर्व भोयर पवार समाजबांधव आजीवन सदस्य,दानदाते,जाहिरतदार बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष कृष्णा देवासे,कार्याध्यक्ष सुरेश देशमुख व सचिव श्रावण फरकाडे यांनी केले आहे.