नागपुरातील डॉक्टरांच्या पुस्तकांचे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन

0
17

नागपूर दि.15 जून:येथील दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत डॉ. दीपिका ठोसरे-चांडोक यांच्या ‘कन्झरवेटीव्ह डेन्टस्ट्री बेसिक्स’ या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाला डेंटल काऊंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. डी. मुजुमदार, पद्यश्री डॉ. आर. के. बाली, पुस्तकाच्या सहलेखिका डॉ. दिलदीप बाली आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना राष्ट्रपती मुखर्जी यांनी डॉ. दीपिका यांची स्तुती केली. देशात बहुतांश लोक मुखरोग व दंतक्षय ही म्हातारपणाची लक्षणे समजून दुर्लक्ष करीत असतात. मात्र, त्यांनी दंत चिकित्सकांचा सल्ला घ्यावा. स्मित ही सार्वभौम भाषा आहे व मला आनंद आहे की, असे स्मित चेहर्‍यावर आणण्यासाठी दंत चिकित्सकाची महत्त्वाची भूमिका असते. डॉ. दीपिका यांचे हे पुस्तक विद्यार्थी, युवा आणि ज्येष्ठांना उपयोगी ठरेल.
राष्ट्रपतिंसोबत व्यासपीठावर बसणे आणि त्यांच्याकडून शाबासकीची थाप मिळणे हा आयुष्यातील परमानंदाची अनुभूती देणारा क्षण आहे. ‘कन्झरवेटीव्ह डेंटिस्ट्री’ ही दंतशास्त्रातील प्रमुख विशेषत: असून त्यात नैसर्गिक दात शक्यतोवर वाचविण्याकडे कल असतो. या शाखा दरवर्षी जास्तीत जास्त अँडवान्सेस होत आहे. या पुस्तकाचा उपयोग पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विषयाच्या मूळ बाबी समजण्यास होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागपूर शहरातील डॉक्टराच्या पुस्तकाचे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच प्रकाशन झाले. डॉ. दीपिका यांनी अनेक कार्यशाळांच्या माध्यमातून दंतरोगाविषयी जनजागृती केली आहे. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शास्त्रीय पेपर्स प्रकाशित झाले आहेत.