मुंबई,दि.15 जून: कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषिग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्याथकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या नवप्रकाश योजनेला येत्या 31 ऑगस्ट 2017 पर्यन्त मुदतवाढ देण्यातआली आहे. या योजनेत सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना वगळता इतर ग्राहकांनी जून 2017 ते 31 ऑगस्ट2017 या कालावधीत थकबाकीची मूळ रक्कम भरल्यास 75 टक्के व्याज व विलंब आकाराची 100 टक्के रक्कममाफ होणार आहे.
नवप्रकाश योजनेत थकबाकीची मूळ रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस,रिकनेक्शन चार्जेस यामध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली असून ग्राहकांना कोणत्याही प्रतिज्ञापत्राची गरज लागणारनाही. शिवाय वीजजोडणीचा अर्ज ग्राहकांना कार्यालयात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरसंबंधित ग्राहकाला थकीत देयकाची किती रक्कम भरावयाची आहे, याची माहिती उपलब्ध करून देण्यात आलीआहे. तसेच जेथे इंटरनेटची सुविधा नसेल अशा ग्राहकांना त्यांच्या थकबाकीच्या रक्कमेचा तपशीलमहावितरणच्या शाखा कार्यालयापासून ते मंडल कार्यालयात तातडीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीजग्राहकांनी या नवप्रकाश योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.





