गोंदिया -येथील शंभर वर्ष जुन्या श्रीकृष्ण गौरक्षण समितीच्या वतीने भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नानाभाऊ पटोले यांंचा सत्कार आज सोमवारी करण्यात आला.गौरक्षण समितीच्या कार्यालयात आयोजित कार्र्यक्रमात त्यांंचा सत्कार समितीचे वरिष्ठ मधुसूदनजी अग्रवाल यांच्या हस्ते शालश्रीफळ देऊन करण्यात आला.त्याआधी खासदार पटोले यांनी गोमातेची पुर्जाअर्चना केली.मंचावर माजी आमदार हरिहरभाई पटेल,मधुसूदनजी अग्रवाल,अध्यक्ष डॉ.बबली अग्रवाल,श्री असाटी व इतर मान्यवर उपस्थित होते.प्रस्तावनेत मधुसूदन अग्रवाल यांनी गौरक्षण समितीच्या स्थापनेची माहिती देत समितीकडे ३० एकर जागा असून वाढत्या गायींची संख्या बघून त्यांच्याकरिता शेड बांधकामाची गरज असल्याने निधी मिळाल्यास सोय होऊ शकते असे सांगत माजी मंत्री प्रफुल पटेल व आमदार गोपालदास अग्र‹वाल यांनी प्रत्येकी ५ लाखाचा निधी याआधी दिल्याचा उल्लेख केला.सत्काराला उत्तर देतांना खासदार नाना पटोले यांनी केंद्र व राज्यसरकार गोहत्येच्या विरोधात लवकरच कडक कायदा करणार असल्याचे सांगत गायीच्या दुधापासून व शेणखतापासून तयार होणारे साहित्य निर्मितीकरिता आपल्या सर्वांना काय करता येईल याचे नियोजन केल्यास माझे पूर्ण सहकार्य लाभणार असे सांगत २५ लाख रुपयाचा निधी गौरक्षण समितीच्या बांधकामासाठी देत असल्याचे जाहीर केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे,जनता सहकारी बँकेचे संचालक जगदीश अग्र‹वाल,जी‹डीसीसीचे संचालक रेखलाल टेंभरे,सडक अर्जुनीचे उपसभापती दामोदर नेवारे,दामिनी संघटनेचे राम पुरोहित,खुमेंद्र मेंढे,शालिनी डोंगरे,दुर्गेश रहांगडाले,दुर्गाबाई तिराले,गुड्डू कार‹डा,सुनील केलनका यांच्यासह गौरक्षण समितीचे सर्व सदस्य व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.