इटखेडा येथे स्वच्छ ग्राम मेळावा

0
15

इटखेडा : स्वच्छ ग्राम मेळाव्याला सहकार्य करून आपले ग्राम स्वच्छ व सुंदर करुन निर्मल करण्याचा संकल्प करुया, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य उमाकांत ढेंगे यांनी केले. स्वच्छ भारत मिशन व गट संसाधन केंद्राच्यावतीने येथील ग्रामपंचायत भवन परिसरामध्ये आयोजित स्वच्छ ग्राम मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
उद्घाटक पंचायत समिती सभापती तारेश ताराम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसभापती रामटेके, पंचायत समिती सदस्य गोपीनाथ लंजे, गटविकास अधिकारी कोरडे, सहायक गटविकास अधिकारी तडस, सरपंच अस्मिता राऊत, उपसरपंच सुखदेव उईके, अरविंद जांभूळकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष झिरपे, तिडका, ग्रा.पं. चे सरपंच मेश्राम, याशिवाय इटखेडा जि.प. क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सचिव व सर्व सदस्य वन व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन समिती व तंटामुक्त समितीचे सर्व सदस्य, पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी, जिल्हा कक्षातील माहिती शिक्षण व संवाद तज्ज्ञ राजेश उखळकर, मनुष्यबळ विकास सल्लागार तृप्ती साकुरे, गटसमन्वयक हेमराज अंबुले उपस्थित होते.
याप्रसंगी गटविकास अधिकारी कोरडे यांनी उपस्थित महिलांना स्वच्छतेप्रती जागरुकता ठेवण्याचे आवाहन केले. तसेच यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष झिरपे व तिडकाचे सरपंच मेश्राम, सहायक गटविकास अधिकारी, जिल्हा कक्षातील उखळकर यांनी यावेळी उपस्थितांना वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामाबाबत माहिती दिली. प्रास्ताविक गट समन्वयक हेमराज अंबुले यांनी मांडले. संचालन शिक्षक सहारे यांनी केले. आभार सचिव सरमरी यांनी मानले.