विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षणाची गरज -पटोले

0
14

कोसमतोंडी : शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देऊन चारित्र्यसंपन्न बनविण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन खा. नाना पटोले यांनी केले.
संत बांगळुबाबा आदिवासी शैक्षणिक सुधारणा मंडळ मालुटोलातर्फे संचालित फुलीचंद भगत विद्यालयाच्या २४व्या वर्धापन दिनाप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटक म्हणून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते. यावेळी साकोलीचे आ.बाळा काशिवार, संस्थापक जगदिश येळे, माधोराव खंडाते, शिवदास रहांगडाले, ताराचंद अंबुले, गणपत टेंभरे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दुलीराम कापगते, अतिथी म्हणून भाजपाध्यक्ष विनोद अग्रवाल, पं.स. उपसभापती दामोदर नेवारे, ब्रम्हानंद मेश्राम, व्यंकटेश, संगीता चौधरी, शामराव शिवणकर, विजय बिसेन, विश्‍वनाथ रहांगडाले, दुर्योधन चौधरी, नंदू रहांगडाले, चंद्रभान कापगते, फलेंद्र रहांगडाले, जागेश्‍वर पाथोडे, मुन्ना हुखरे, युनीस पटेल, हेमराज टेंभरे, रामचंद्र काशिवार, जगदिश काशिवार, लता काळसर्पे, उपस्थित होते. आभार बी.बी.येळे यांनी मानले.