वन्यप्राण्यांसाठी बांधला वनराई बंधारा

0
104

सडक-अर्जुनी,दि.18 : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बोंडे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश चोपडे, नवेगावबांधचे सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात कोटजंभोरा येथील ग्राम परिस्थिती की विकास समितीच्या माध्यमातून पिंडकेपार कान्हा मेंट नं.६६७, ६६८ मध्ये श्रमदानातून सामूहिक गस्त करुन वनराई बंधारा बांधण्यात आला. या बंधाºयाजवळ चार ते पाच फुट पाणी साचले आहे.
बंधारा बांधण्यासाठी २२० सिमेंटच्या रिकाम्या बोरीचा वापर करण्यात आला. ईडीसीच्या सर्वच सदस्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधकामात मदत केली. बंधारा जंगलात असल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांची शिकार होणारच नाही. सहवनक्षेत्र पिंडकेपार परिसरात वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
बिबट, हरीण, सांबर, निलगाय, अस्वल, रानडुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांची संरक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेऊन राखीव वनात वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय वनराई बंधारा बांधून करण्यात आला.श्रमदानातून बंधारा बांधण्यासाठी सहवनक्षेत्र अधिकारी प्यारेलाल उसेंडी, ईडीसीचे अध्यक्ष लखनलाल दूधकवर,तेजराम मडावी, मन्साराम नेताम, रुपेश राऊत, मानीक ताराम, गेंदलाल गामगवाल, धनराज हिडानी, अशोक राऊत, कौशल्या मडावी, वनीता मेश्राम, जनाई वालदे, भुमला मडावी, नरेश गंगबोईर, पिंडकेपारचे वनरक्षक शिला दाळपीटे, कोटजंभोराचे वनरक्षक अमितकुमार शहारे यांनी सहकार्य केले. क्षेत्र सहायक उसेंडी यांनी ईडीसीचे आभार मानले.