गोंदिया शहरात नवरात्रीची धूम…..

0
18

गोंदिया,दि.27- पवार प्रगतीशील मंचच्या अखत्यारीतील पवार सांस्कृतिक भवन कन्हारटोली येथे पवार नवयुवक समिती व नवरात्री रास गरबा समितीतङ्र्के आयोजित पवार रास गरबा मंडपाला दररोज भाविकांची अलोट गर्दी उसळत आहे. मागील काही वर्षापासून आयोजित या उपक्रमाला तरूणी,महिला व युवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थित असते.कालच गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष तसेच मनोहरभाई पटेल अ‍ॅकडेमीच्या अध्यक्षा वर्षाताई प्रफुल पटेल यांनी पवार रास गरबा मंडपाला भेट दिली व या उपक्रमाचे कौतुक करून स्वतः रास गरबात सहभाग घेवून सर्वांचा उत्साह वाढविला. नवरात्रीच्या आधीपासूनचपवार रास गरबाची पूर्व तयारी १५ ते २० दिवसाआधी सुरू होते.तज्ञ प्रशिक्षकाच्या वतीने या वर्षी २५० लोकांना रास गरबाचे प्रशिक्षण देण्यात आले. रास गरबा सोबतच आयोजक मंडळाच्या वतीने पवार व्यापार मेळावा तसेच इतर उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने उपस्थिताची गर्दी वाढत आहे.

वर्षाताई पटेल यांच्या सोबत प्रगतीशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश चव्हाण,सचिव किशोर भगत,सुरेश पटले,संजय रहांगडाले ,महिला समितीच्या छायाताई पटले,मंजुषा हरिणखेडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.पवार रास गरबा कार्यक्रमाला दररोज भाविकांची गर्दी वाढत असून दररोज ५ ते ७ हजार भाविक या गरबा मंडपाला भेट देत आहेत. व्यवस्थेसाठी रास गरबा आयेजन समितीचे केतन तुरकर,पंकज पटले,संदीप बघेले,गौरव तुरकर,प्रतिक रहांगडाले,बाबा बिसेन,कुणाल बिसेन,दीपम देशमुख,जलज येळे,राहुल बिसेन,योगेश ठाकरे, नवयुवक समितीचे छत्रपाल चौधरी,गुलाब ठाकूर, संदीप रहांगडाले,सोनु येळे, अंकित बिसेन,देवेश गौतम, मुनेश अंबुले,प्रविण पटले,जयेश चव्हाण व इतर सदस्य परिश्रम घेत आहेत.