संपाचा 17 वा दिवस,अंगणवाडी सेविकांनी दिल्या पंकजा मुंडे विरोधी घोषणा

0
8

गोंदिया,दि.27 -महाराष्ट्र राज्य आंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन व कृती समितीच्यावतीने आज दि.27 रोज बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्च्याचे आयोजन करुन ग्रामविकास व महिला बालकल्याण पंकजा मुंडेविरोधी घोषणा देत शासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदविला. अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी शासनाने जाहीर केलेल्या तुटपुंज्या मानधनवाढीचा निषेध केला. शासनाने मागील आठवड्यात अंगणवाडी सेविकांना १५०० रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांना १२५० रुपये, तर मदतनिसांना १ हजार रुपयांची मानधनवाढ जाहीर केली. मात्र, ही मानधनवाढ तुटपुंजी असून, सरकारने अंगणवाडी आमच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी केला. या मोर्चाचे नेतृत्व हौसलाल रंहागंडाले,आम्रकला डोंगरे,विठा पवार,प्रणीता रंगारी,शोभा लोपसे,मंगला शहारे,हिंदमजूर सभा यांच्या नेतृत्वात करण्यात आले.मोर्च्यानंतर मुख्यमंत्री व महिला बालविकास मंत्री यांच्या नावे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सोपविण्यात आले.यावेळी विना गौतम,सुनिता मलगाम,ब्रिजुला तिडके,मिनाक्षी पटले,ज्योती लिल्हारे,लता बोरकर,अंजना ठाकरे,वच्छला भोंगारे,पौर्णिमा चुटे,रामदास पाटील,परेस दुरुगवार,चरणदास भावे,अर्चना मेश्राम आदी उपस्थि होते.