सेन्सेक्सने गाठली विक्रमी उच्चांकी पातळी

0
21

मुंबई: शेअर बाजारात तेजी सुरूच असून आज (गुरुवार) सेन्सेक्स प्रथमच २९ हजार पातळीच्या वर पोहोचण्यास यशस्वी ठरला आहे. निफ्टी निर्देशांक ८७५० पातळीच्यावर व्यवहार करत आहे. शिवाय स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकात देखील खरेदीचा जोर कायम आहे.

मेटल, फार्मा, कैपिटल गुड़स आणि आयटी सेक्टरमध्ये खरेदी सुरु असल्याने बाजाराला चांगला आधार मिळाला आहे. सध्या (१० वाजून २५ मिनिटे ) सेन्सेक्स १३८ अंशांनी वधारला असून २९ हजार २७ पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टी ०. ३६ टक्क्यांनी वधारला असून ८७६० पातळीवर व्यवहार करत आहे.

आजच्या तेजीत ८७ कंपन्यांच्या शेअर्सनी वर्षभरातील सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. आज शेअर बाजारात निफ्टीत निर्देशांकात डीएलएफ , सनफार्मा यांचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत

शिवाय, सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात वाढ झाल्याने रूपयामध्ये 7 पैशांनी वाढ झाली आहे. आज रुपयाचे मूल्य 61.56 रूपये प्रति डॉलर झाले आहे. निर्यातदारांनी अमेरिकी डॉलरच्या विक्रीमुळे तसेच देशांतर्गत शेअर बाजारात विक्रमी सुरूवात आणि सातत्याने होणाऱ्या परकीय गुंतवणूकीचा रूपयाला आधार मिळाला आहे. कालच्या व्यवहारात रूपया सहा पैशांच्या वाढीसह 61.63 प्रति डॉलवर बंद होता.