तिगाव येथे १९ नोव्हेंबारला ओबीसी जनजगणा परिषद

0
13

गोंदिया,दि.०८: ओबीसी सेवा संघाच्यावतीने संवैधानिक राष्ट्र निर्माण अभियानांतर्गत ओबीसी जनगणना परिषद व सत्कार समारोहाचे आयोजन आमगाव तालुक्यातील तिगाव येथे १९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ओबीसींची जातीनिहाय जनगणना हाच ओबीसी मुक्तीचा जाहिरनामा या विषयावर बळीराज धोटे मागदर्शन करणार आहेत. तर मागास वर्गीय स्त्रीयांचे शिक्षण, नौकरी, उद्योग, क्रीडा, संगीत व शासन प्रशासनात अत्यल्प प्रमाण असल्याच्या कारणांचा शोध व बोध या विषयावर जेष्ठ समासेविका नंदाताई फुकट मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक़्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गुणेश्वर आरीकर, ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, ओबीसी सेवा संघाचे तालुकाध्यक्ष हरिश ब्राम्हणकर, महिला अध्यक्ष जयश्री फुंडकर, सदस्य अशोक पटले उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा.बी.एम. करमकर हे राहणार आहेत. रात्रीला ८ वाजता सप्त खजरी वादक तुषार सूर्यवंशी यांच्या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते डॉ. के.जी. तुरकर यांच्या हस्ते, ओबीसी सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष सावन कटरे, जिल्हा संगठक डॉ. गुरुदास येडेवार, ओबीसी संघर्ष कृती समितीचे आमगाव तालुकाध्यक्ष लिलाधर गिèहेपुंजे, बघेडा सरपंच योगेश्वरीबाई तुरकर, तिगावचे पलिस पाटील घनश्याम गायधने यांच्या उपस्थितीत तिगावचे सरपंच नरेंद्र शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमात गुणवंत विद्याथ्र्यासह नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात येणार आहे.