गोंदिया,दि.०८: – ८ नोव्हेंबर २०१६. भारतीय अर्थविश्वातील काळा दिवस. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना काही विशिष्ट व्यक्ती वा त्यांच्या समूहाने लादलेली ती सर्वसामान्यांसाठी जणूकाही श्वासबंदीच ठरली.जिल्ह्यातील बड्या नेत्यांना व उद्योगपतींना या नोटबंदीमुळे काडीचाही त्रास झाला नसला तरी गोंदिया जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक,लहान व्यापारी,राईसमिर्लससह गोंदिया शहरासह जिल्ह्यात फोपावलेल्या प्रापर्टीव्यवसायला चांगलाच फटका बसला आहे.नोटबंदीच्या आधी बाजारात जी गर्दी बघावयास मिळायची ती गर्दी यावेळी दिवाळीच्या उत्साहातही दिसून आली नाही तर गेल्या वर्षभरातही कापड व्यवसायासह इतर व्यवसायवारही त्याचा परिणाम दिसून आला.लहान मोठी दुकाने चालवितांना अनेक व्यवसायिकांना फटका बसला.गोंदिया जिल्हयाचा विचार केला तर या जिल्हयातील गोंदिया शहरासह तालुक्याच्या ठिकाणी प्रार्पटी व्यवसाय गेल्या काही वर्षात चांगलाच फळाला आलेला होता.जमिन खरेदी विक्रीसह लेआऊटसच्या माध्यमातून प्लाटविक्री व फ्लटच्या व्यवसायाला गेल्यावर्षभरात जी गळती आली ती सर्वात मोठी गळती नोटाबंदीची ठरली.प्रार्पटीच्या व्यवसायात जे काही लहान मोठे दलाल म्हणून काम करणारे सर्वसामान्य लोक होती त्यांच्यावर या नोटाबंदीमूळे स्वतःचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या गोष्टीवर पुर्णत बंदी आली आहे.दर महिन्याला ५०-१०० मोठ्या डिqलग एकट्या गोंदिया शहरात जमिन व्यवहाराशी व्हायच्या त्या आजच्या घडीला २५-५० येऊन ठेपल्या आहेत.तर या जिल्ह्यातील मोठा उद्योग राईस मिलचा परंतु यांनाही याचा फटका असून शेतकèयांकडून रोख स्वरुपात जी खरेदी व्हायची qकवा अग्रीम स्वरुपात व्यापारी शेतकèयांना धानाच्या मोबदल्यात पैसा देऊन ठेवायचा त्यावरही या नोटबंदीचा फटका बसल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे.
नोटबंदीमुळे शेतकèयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. लहान व्यापारी हा डबघाईस आला.जिल्हापरिषद,नगरपरिषदेच्या माध्यमातून छोट्या मोठ्या स्वरुपाचे जे काम कंत्राटदार करायचे त्यांनाही फटका बसला असून अनेक कंत्राटदार नोटाबंदी व कॅशलेसमुळे त्रास होत असल्याचे बोलू लागले आहेत.भाजीविक्रेते, दुधविक्रेते, शेतकरी, मजूर, वित्तीय क्षेत्रात काम करणारे छोटेछोटे कमिशन एजंट यांचेवर आर्थिक बंदीची कुèहाड कोसळली.गोंदियातील कॅन्टीन व भोजनालय चालविणारे रवी हलमारे या युवा व्यवसायिकांने तर नोटाबंदीच्या आधी जो व्यवसाय व्हायचा तो आत्ता राहिला नसून पुर्वीसारखे ग्राहकही येत नसल्याचे सांगितले.काळ्याधनाच्या नावावर सरकारने नोटबंदी करुन आमच्या सारख्या छोट्या व्यवसायी व्यापारी वर्गाचीच नव्हे तर सर्वसामान्यांची गळचेपी केल्याची प्रतिक्रिया हलमारे यांनी व्यक्त केली.





