सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत स्वच्छतेचे कार्य करा-दयानिधी

0
14

गोंदिया,दि.०५ः वैयक्तिक शौचालय अत्यंत गरजेचे आहे.आपण उघड्यावर शौचास गेलो,तर संपूर्ण गाव आजारात पडू शकतो.त्यामुळे सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत स्वच्छतेचे कार्य करा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी केले.दयानिधी यांनी गुरुवार(दि.४)रोजी पहाटे पाच वाजता आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथे गुडमार्निग पथक अंतर्गत भेट देऊन गावकरी व विद्याथ्र्यांशी संवाद साधला.जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस.डी.मुंडे,पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुकाअ राजेश राठोड,आमगावचे बीडीओ पांडे यावेळी उपस्थित होते. मुकाअ दयानिधी यांनी विद्याथ्र्यांशी संवाद साधताना म्हणाले की,विष्ठेवर माशी बसते,तिच माशी आपल्या सहा पायावर तीन लक्ष विषाणू घेऊन आपल्या अन्नावर येऊन बसते.त्यामुळे ५० प्रकारचे आजार होतात.हे आजार केवळ शौचालय तयार करुन,त्याचा वापर करुन आपल्याला टाळता येऊ शकतात.त्यासाठी शौचालय गरजेचे आहे.गृहभेटीदरम्यान नागरिकांना त्यांनी शौचालयाचा वापर करण्याचे आवाहन केले.तसेच शौचालयाचा वापर न केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते असेही सांगितले.यावेळी सरपंच,ग्रामपंचात सदस्य,विस्तार अधिकारी,पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.