संघर्षातूनच उद्याच्या सामर्थ्याची निर्मिती-अंजनाबाई खुणे

0
50

अर्जुनी-मोरगाव (संतोष रोकडे),दि.20: मानव हा आपल्या भाग्याचा शिल्पकार आहे. परंतु हे भाग्य आपोआप निर्माण होत नाही. तर ते स्वत:च्या प्रयत्नाने व कष्टाने जगण्याच्या संघर्षात ज्यांनी स्वत:ची क्षमता सिद्ध केली तो विविध क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवू शकतो. कारण संघर्षातूनच उद्याच्या सामर्थ्याची निर्मिती होत असते, असे प्रतिपादन झाडीपट्टीच्या बहिणाबाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या कवयित्री अंजनाबाई खुणे यांनी केले.
येथील सरस्वती विद्यालयात आयोजित महिला पालक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुशीलादेवी भुतडा होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, सरस्वती विद्यालयाच्या पर्यवेक्षिका वीणा नानोटी, सुनिता डांगे, छाया घाटे, सरीता शुक्ला उपस्थित होते.
याप्रसंगी नानोटी यांनी, महिलांनी सर्व बंधन पाळून कार्यक्षेत्रात गरुडझेप घ्यावी. सुंदरता चेहºयात नसते तर तिच्या कर्तृत्वात असते. प्रत्येकीने श्रमाचा ध्यास घ्यावा, नारी तू घे उंच भरारी, फिरु नकोस माघारी असे मत प्रास्ताविकातून मांडले. यावेळी विविध क्षेत्रात संघर्षमय परिस्थितीवर मात करुन ज्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली अशा महिला नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, निवृत्त मुख्याध्यापिका जयश्री काशीवार, कवयित्री अंजनाबाई खुणे, जि.प. सदस्य मंदा कुंभरे, नगर पंचायत सदस्य गीता ब्राम्हणकर, ममता पवार, सरपंच कुंदा डोंगरवार, शिक्षीका मिना लिचडे, उद्योजिका प्रतिमा फुंडे, आरोग्यसेविका नंदेश्वर, बचत गट कार्यकर्त्या वनिता घोडाम, भाजीपाला विक्रेता कुसुमताई, गृह उद्योजिका माधुरी अवचटे, खानावळ संचालक अल्का भेंडारकर, नलीनी राऊत, राज्यस्तरीय खेळाडू रिना सैय्यद, कंडक्टर रेखा झोडे, महिला पोलीस नायक यान्ना नरेटी, बचत गट अधिकारी रिता दडमल, बुटीक संचालिका ममता नाकाडे यांचा सम्मानचिन्ह देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जयश्री काशीवार, मंदा कुंभरे, कुंदा डोंगरवार, नंदेश्वर, प्रतिभा फुंडे, जयश्री राजगिरे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन अर्चना गुरनुले व प्रा. नंदा लाडसे यांनी केले. कार्यक्रमासाठी माधुरी पिलारे, उषा मेश्राम, दिपाली कोट्टेवार, भाग्यश्री सिडाम, प्रा.तारण रुखमोडे, नजमा अगवान, शितल राऊत, रेखा रामटेके, संध्या पवार, धनश्री चाचेरे, चेतना गोस्वामी, वंदना शेंडे यांनी सहकार्य केले.
महिला मेळाव्यात ११०० महिलांची उपस्थिती होती. शाळेतील इतर सर्व शिक्षकांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.