गोंदियात ठिकठिकाणी राजाभोज जयंती

0
19

गोंदिया: पोवार समाज गौरव सम्राट राजाभोज जयंती महोत्सव ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. यात समाजबांधवांना आपला समाज व जातीची माहिती देऊन एकता निर्माण करणे, वाईट चालीरितींना दूर करून बोली, संस्कार व आदर्श जतन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
गोंदिया : नंगपुरा-मर्ूी येथे राजाभोज जयंती कार्यक्रमाचे उद््घाटन राष्ट्रीय क्षत्रिय पोवार महासभेचे अध्यक्ष डॉ.बी.एम. शरणागत यांच्या हस्ते पोवार मंचचे जिल्हाध्यक्ष डॉ. कैलाशचंद्र हरिणखेडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. ध्वजारोहण डॉ. खुशाल बोपचे यांच्या हस्ते झाले. अतिथी म्हणून माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, माजी आ. हेमंत पटले, लिखेंद्र बिसेन, आय.डी. पटले, गुलाबराव बोपचे, विलास चव्हाण, निलेश रहांगडाले, संजय टेंभरे, भोजलाल बिसेन, एम.ए. ठाकूर उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांनी राजाभोज यांच्या जीवनावर प्रकाश टाकून समाज संघटन, एकता व प्रगतीवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.बालकांनी रांगोळी व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. रात्रीला श्रीकृष्ण दंडार मंडळ मसवाणीद्वारे (ता. सडक-अर्जुनी) पोवारी कीर्तन, समाजप्रबोधन, दहीकाला व महाभोज देण्यात आला.
संचालन अशोककुमार हरिणखेडे यांनी तर आभार अनिल कटरे यांनी मानले. कार्यक्रमात समाज बांधव-भगिणी व युवा वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
देवरी : राष्ट्रीय पोवार क्षत्रिय महासभा व क्षत्रिय पोवार समाज संघटना तालुका देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने राजाभोज जयंती साजरी करण्यात आली.
राजभोज दिंडीला सामाजिक कार्यकर्ते अनिल बिसेन यांनी हिरवी झेंडी दाखवून धुकेश्‍वरी मंदिरापासून सुरूवात करण्यात आली.मोठय़ा संख्येने पोवार बंधू-भगिणी सहभागी होवून दिंडी शहरातील प्रमुख मार्गाने नेवून राजाभोज नगरीत पोहचली. तेथे राजाभोज यांच्या छायाचित्राचे पूजन करण्यात आले.
उद््घाटन नेतराम कटरे यांच्या हस्ते ज्ञानेश्‍वर टेंभरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून हेमंत पटले, जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, शैलेश कटरे, श्याम रहांगडाले, मधुकर ठाकूर, रमेश टेंभरे, विलास चव्हाण, लीलेश्‍वर रहांगडाले, बबलू कटरे उपस्थित होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी एकजूट होण्याची गरज, समाजाचा इतिहास, नेतृत्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. पोवार समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते अनिल बिसेन, मदन पटले, ज्ञानेश्‍वर टेंभरे, राजकुमार रहांगडाले, जितेंद्र रहांगडाले यांना पोवार गौरव पुरस्कार देवून सत्कार करण्यात आले. या वेळी अनिल बिसेन यांनी साईनगरी ले-आऊटमध्ये अर्धा एकर जमीन समाजासाठी दान दिली.
संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद््घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महिला व बाल कल्याण सभापती सविता पुराम उपस्थित होत्या. आ. पुराम यांनी १0 लाख रूपये आमदार निधीतून समाजभवनासाठी देण्याची घोषणा केली. कार्यक्रमासाठी क्षत्रिय पोवार समाज संघटना तालुका देवरीच्या पदाधिकार्‍यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)