राका येथे इंजी. दवंडे महाराजांचा समाजप्रबोधन कार्यक्रम आज

0
11

सडक अर्जुनी,दि.3ः – संत तुकाराम महाराज बिज मुर्ती अनावरण व छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळ्याचे आयोजन सडक अर्जुनी तालुक्यातील राका येथे सार्वजनिक कुणबी समाजाच्या वतीने दि. ३ व ०४ मार्चला आयोजीत केले आहे. पहिल्या दिवशी ०३ मार्च शनिवारला राञी ०८ वाजता राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजीरीवादक इंजी. पवन दवंडे महाराज अमरावती यांचा समाजप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे.