गोंदिया जिल्ह्यात मतदानात महिला आघाडीवर

0
9
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया- विधानसभा निवडणुकीसाठी (ता.१५) रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत गोंदिया जिल्ह्यातील चारही मतदारसंघात पुन्हा एकदा महिला मतदारांनी पुरुषांच्या तुलनेत अधिक मतदान केल्याचे आयोगाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. मतदान केलेल्या महिला मतदारांची टक्केवारी अर्जूनीमोर मतदारसंघात ७२.२९ तर सर्वांत कमी गोंदिया मतदारसंघात ६६.०२ टक्के एवढी राहिली.
तेराव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. ही निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आयोगाने सर्वत्र चोख बंदोबस्त केला होता. परिणामी, गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले. जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील १० लाख २२ हजार ८३० मतदारांपैकी ७ लाख ६ हजार ८३३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
mahila-aaghadiwar
यात ५ लाख १२ हजार ६४२ पुरुष मतदारांपैकी ३ लाख ५१ हजार ३१४ तर ५ लाख १० हजार १८२ महिला मतदारांपैकी ३ लाख ५५ हजार ५१८ मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. विधानसभानिहाय आकडेवारी अशी- अर्जूनीमोर विधानसभा मतदारसंघ पुरुष ८५ हजार १६३ (१ लाख २० हजार ५२९) ७०.६६ टक्के, महिला ८४ हजार ६२७ (१ लाख १७ ६५) टक्केवारी ७२.२९, तिरोडा विधानसभा मतदार संघ पुरुष ८२ हजार ६१० (१ लाख १९ हजार ५७९) ६९.०८ टक्के, महिला ८४ हजार ३०६( १ लाख १९ हजार ७१८) ७०.४२ टक्के, गोंदिया विधानसभा मतदारसंघ पुरुष ९७ हजार ९७ (१ लाख ४६ हजार १३५) टक्केवारी ६६.४४, महिला ९७ हजार ५८५ (१ लाख ४७ हजार ८०४) टक्केवारी ६६.०२ आणि आमगाव विधानसभा मतदारसंघ पुरुष ८६ हजार ४४४ (१ लाख २६ हजार ३९९) टक्केवारी ६८.३९ तर महिला ८९ हजार (१ लाख २५ हजार ५९५) टक्केवारी ७०.८६. जिल्ह्यात ५ लाख १२ हजार ६ हजार ४२ पुरुष मतदारांपैकी ३ लाख ५१ हजार ३१४ आणि ५ लाख १० हजार १८२ महिला मतदारांपैकी ३ लाख ५५ हजार ५१८ मतदारांनी आपल्या मताधिकाराचा वापर केला. इतर मतदारांमध्ये ६ पैकी एकानेच आपला मताधिकार वापरला.