प्रफुल पटेल १७ व १८ ला गोंदियात

0
13

गोंदिया : खासदार प्रफुल पटेल हे १७ व १८ फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या दौर्‍यावर जिल्ह्यात येत आहेत. या दौर्‍यात ते जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांत उपस्थित राहणार आहेत.
१७ फेब्रुवारी रोजी ते सकाळी १0 वाजता चांदपूर दर्शन, १0.३0 वाजता गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन ११ वाजता प्रतापगड यात्रेसाठी रवाना होतील. सायंकाळी ६ वाजता तालुक्याती पिंडकेपार व ७ वाजता नागरा शिव मंदिरात दर्शन करतील. तसेच १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता गोरेगाव तालुक्यातील हिराटोला येथे मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनाला उपस्थित राहतील.
दुपारी २ वाजता अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा येथे आदिवासी समाज जागरण मेळाव्याला उपस्थित राहून क्रांती सुर्य भगवान बिरसा मुंडा पुर्णाकृती पुतळ्य़ाचे अनावरण करतील. तर दुपारी ३ वाजता हेलीकॉप्टरने भंडारा करिता रवाना होणार आहेत.