कॉ. गोविंद पंढरीनाथ पानसरे जीवनपट

0
25

कॉ. गोविंद पंढरीनाथ पानसरे
जन्म – २६ नोव्हेंबर १९३३ – कोल्हार (ता. श्रीरामपूर) जि. नगर.
शिक्षण – प्राथमिक – कोल्हार, माध्यमिक- राहुरी – कोल्हापूरला प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमध्ये प्रवेश – महाविद्यालयीन शिक्षण राजाराम महाविद्यालय – बीए (ऑनर्स) शहाजी लॉ कॉलेजमध्ये एलएल.बी.
व्यवसाय – कोल्हापुरातील सुरवातीचे काही दिवस वृत्तपत्र विक्रेत्याचे काम.
कोल्हापूर पालिकेत काही दिवस ऑक्‍ट्रॉय विभागात शिपाई.
पदवीनंतर काही काळ प्राथमिक शिक्षण मंडळात शिक्षक म्हणून अध्यापन.
१९६४ मध्ये वकील व्यवसायास प्रारंभ; वंचित, गोरगरिबांचे खटले मोफत चालविले.
कामगार आणि औद्योगिक कायद्यातील निष्णात वकील.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष.
शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात सहयोगी व्याख्याता म्हणून सुमारे दहा वर्षे अध्यापन.

समाजवादी व डावा समाजवादी गट यात प्राथमिक कार्य
१९५२ पासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद
दहा वर्षे भारतीय कम्यनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य
१९५५ – गोवामुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग
संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कोल्हापूर जिल्हा शाखेचे सचिव म्हणून पाच वर्षे जबाबदारी
१९६५ उपासमारविरोधी कृती समितीचे नेते; या आंदोलनात महत्त्वाचा सहभाग
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष
इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनी या संस्थेच्या स्थापनेत सहभाग; पंचवीस वर्षे कार्यकारिणीवर सदस्य

लेखन
शिवाजी कोण होता ? (१९८४) चोवीस आवृत्त्या, सुमारे एक लाख प्रतींची विक्री – कानडी, उर्दू, गुजराथी, इंग्रजी, हिंदी भाषांत अनुवाद
मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्‍न (१९८३) चार आवृत्त्या
अजून न स्वीकारलेला मंडल आयोग (१९९७) दोन आवृत्त्या
मंडल आयोग आणि मागासलेले मुस्लिम ( १९९८)
काही कामगार कायद्यांची तोंडओळख (१९९२) चार आवृत्त्या
३७० कलमांची कुळकथा (१९९४)
मुस्लिमांचे लाड ( १९९४) तीन आवृत्त्या
पंचायत राज्याचा पंचनामा
अवमूल्यन – कळ सोसायची कुणी?
राजर्षी शाहू – वसा आणि वारसा (तीन आवृत्त्या)
कामगारविरोधी कामगार धोरणे (तीन आवृत्त्या)
वृत्तपत्रांतून अनेक लेख, मंडल आयोग आणि शिवचरित्रावर महाराष्ट्रात शेकडो व्याख्याने

पुरस्कार
भीमक्रांती पुरस्कार
सामाजिक कार्यासाठी ‘भाई माधवराव बागल’ पुरस्कार – १९९८
कोल्हापूर महापालिकेचा ‘कोल्हापूर भूषण’ पुरस्कार – २००२
क्रांतिज्योती सावित्रिबाई फुले पुरस्कार, नाशिक २००८
कॉ. दत्ता देशमुख पुरस्कार, कोल्हापूर – २००९
राजर्षी शाहू पुरस्कार, कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे आणि संस्था व संघटना
दळप-कांडप गिरणीमालक संघ
मेकॅनिकल व इंजिनियरिंग कामगार संघ
कोल्हापूर फेरीवाले युनियन
करवीर कामगार संघ
कोल्हापूर जिल्हा सहकारी नोकर युनियन
कोल्हापूर ड्रिस्ट्रिक बॅंक एम्लॉईज युनियन
सदर्न महाराष्ट्र बॅंक एम्लॉईज युनियन (रत्नाकर बॅंक ए. यु.)
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक कामगार संघ
कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघ
कोल्हापूर जिल्हा सह संस्था गट सचिव संघटना
कोल्हापूर जिल्हा घरेलू कामगार मोलकरणी संघटना
कोल्हापूर जिल्हा ‘आशा’ कर्मचारी संघटना
कोल्हापूर जिल्हा शेतमजूर संघटना
कोल्हापूर जिल्हा बेघर झोपडपट्टी संघटना
कोल्हापूर जिल्हा म्युनिसिपल कामगार संघ
कोल्हापूर जिल्हा अंशकालीन परिचय कामगार संघटना
करवीर ऑटोरिक्षा युनियन
श्रमिक प्रतिष्ठान
श्रमिक सहकारी पतसंस्था
आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह साह्यता केंद्र
ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन
ऑल इंडिया यूथ फेडरेशन
आम्ही भारतीय लोक आंदोलन
समाजवादी प्रबोधिनी
भारतीय महिला फेडरेशन

कॉ गोविंद पानसरे साहित्यसंपदा
मुस्लिमांचे लाड
मंडल आयोग व मागासलेले मुस्लिम
सच्चर समिती व मागासलेले मुस्लिम
मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्‍न
अजून न स्वीकारलेला मंडल आयोग
धर्माच्या नावाखाली अधर्म
धर्म, जात, वर्ग आणि परिवर्तनाच्या दिशा
राजर्षी शाहू – वसा आणि वारसा
शिवजन्म – कुचाळकी ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड
जागतिकीकरण व शेतकऱ्यांचे प्रश्‍न
सरकारचे परधार्जिणे शेती धोरण
डंकेलचा हल्ला चौफेर
धर्मासंबंधी परिवर्तनवाद्यांची भूमिका काय असावी
वर्तमानपत्रे आणि कायदा
काश्‍मीरबाबतच्या कलम ३७०ची कुळकथा
अवमूल्यन – कळ सोसायची कुणी – पर्याय काम
पंचायत राज्याचा पंचनामा
काही कामगार कायद्यांची तोंडओळख
अंधश्रध्दा निर्मूलन कायदा आहे तरी काय?
शिवाजी कोण होता?
मार्क्सवादाची तोंडओळख