विद्यमान आमदाराने राखला गड कायम

0
21
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अर्जुनी मोरगाव : काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला या मतदार संघात सर्वाधिक बंडखोरीचा सामना करावा लागला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नाराज पदाधिकाèयांनी पक्षाच्याच उमेदवाराविरोधात छुपा प्रचार केला. अशा स्थितीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसने तिस-या क्रमांकाची ३१७२७ मते घेतली. या मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने राजकुमार बडोले यांना दुस-यांदा उमेदवारी दिली. मतदानाच्या पूर्वीपासून राजकुमार बडोले यांचा विजय निश्चित असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले. अपेक्षित निकाल आज समोर आला. बडोले यांनी ६४१०५ मते घेतली. त्यांनी काँग्रेस पक्षाचे राजेश नंदागवळी यांचा ३०१२४ मतांनी पराभव केला. काँग्रेसने राजेश नंदागवळी या तरुणाला उमेदवारी दिली. नंदागवळी यांना जनसंपर्काचा अभाव नडला. त्यांना फक्त ३३९८१ इतकी मते घेऊन दुसèया क्रमांकावर समाधान मानावे लागले. नंदागवळी यांना उमेदवारी मिळाल्याने रत्नदीप दहिवले आणि अजय लांजेवार यांनी बंडखोरी केली. याचा फटका पक्षाला बसला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्षभरापूर्वी प्रवेश करणारे मनोहर चंद्रीकापुरे यांना उमेदवारी मिळाली. मतदानाच्या दोन दिवसापूर्वी शर्यतीत नसताना देखील त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त ३१७२७ मते घेऊन तिसèया क्रमांकाची मते घेतली. त्यामुळे काँग्रेसला देखील तोंडात बोटे घालावी लागली. शिवसेनेच्या किरण कांबळे यांना १५२७८ मते मिळाली. या मतदार संघातील १७२७ मतदारांनी नोटाला पसंती देत एकही उमेदवार लायक नसल्याचे दाखवून दिले. प्रफुल्ल पटेल यांनी या मतदार संघावर लक्ष केंद्रित केले होते. परंतु, त्यांचा देखील जादू येथील मतदारांवर पडला नाही.