भाजपचे विजय रहांगडाले १२,३४१ मतांनी विजयी

0
11
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तिरोडा : गोंदियानंतर सर्वाधिक काट्याची लढत तिरोडा मतदार संघात होती. येथे राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनसोड यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढली. भाजपचे आमदार खुशाल बोपचे यांची तिकीट कापण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि बोपचे समर्थकांच्या नाराज समर्थकांमुळे भाजपला फटका बसून त्याचा फायदा काँग्रेसला होणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला. शिवाय भाजपचेच पंचम बिसेन यांनी शिवसेनेतून निवडणूक लढल्यामुळे भाजपच्या मतांवर परिणाम होणार असल्याचा अंदाज लावण्यात येत होता. परंतु, सर्वच गणिते फोल ठरली. येथे भारतीय जनता पक्षाचे विजय रहांगडाले यांनी ५२३६० मते घेऊन विजय मिळविला. दिलीप बनसोड यांना दुसèया क्रमांकाची ४००१९ इतकी मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजलक्ष्मी तुरकर ३०६३० मते घेऊन तिसèया क्रमांकावर, तर काँग्रेसचे परसराम कटरे १६८५७, शिवसेनेचे पंचम बिसेन ११६१७, बसपला ५१४७ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजलक्ष्मी तुरकर आणि अपक्ष दिलीप बनसोड यांच्या मतांची बेरीज केली असता, बंडखोरी टळली असती, तर येथून राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित होता, असे म्हणावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरीचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला. पोवार बहुल मतदार संघाला त्यांच्याच समाजातील विजय रहांगडाले हे आमदार म्हणून निवडून आले. भारतीय जनता पक्षाला आपला मतदार संघ शाबूत राखण्यात यश आले. या मतदार संघात तिरोड्यातील काँग्रेसने काँग्रेस उमेदवाराला साथ न दिल्याने पहिल्या चार मध्ये येऊ शकले नाही. काँग्रेस उमेदवाराला तालुका वादाचा फटका सहन करावा लागला.