24.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home Featured News छगन भुजबंळाची घेतली सविंधानिक न्याय यात्रेच्या प्रमुखांनी भेट

छगन भुजबंळाची घेतली सविंधानिक न्याय यात्रेच्या प्रमुखांनी भेट

0
30

मुंबई,दि.8ः महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार छगन भुजबळ यांची सोमवारला मुबंईतील केईएम रुग्णालयात ओबीसी सविंधानिक न्याय यात्रेचे संयोजक माजी आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने भेट घेऊन 11 मे रोजी आझाद मैदान येथे आयोजित ओबीसी संविधानिक न्याय यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली.या कार्यक्रमात ओबीसी योध्दा या पुरस्काराने भुजबळ यांना सन्मानित करण्यात येणार आहे.यावेळी प्रा.श्रावण देवरे लिखित ओबीसी जनगणना ही पुस्तक भेटस्वरुपात देण्यात आली.भुजबळ यांची  प्रकृती अद्यापही खालावलेली असून त्यांचे वजन सातत्याने कमी होत चालले आहे.अशा परिस्थीतीत त्यांनी चळवऴीच्या लोकांशी मनमोकळ्या चर्चा केल्या. यावेळी माजी आमदार हरिभाऊ राठोड, प्रा.श्रावण देवरे, किरणशेठ झगडे, ओमप्रकाश मौर्या व इतर मान्यवर उपस्थित होते.

blank