ओवेसी यांची आज नागपूरमध्ये सभा, काही अटींवर पोलिसांची परवानगी

0
13

नागपूर – ‘एमआयएमचेप्रमुख असदुद्दीन ओवेसींच्या शनिवारी, २८ ला आयोजित सभेला पोलिसांनी काही अटींवर परवानगी दिली. जातीय तेढ निर्माण होईल, असे प्रक्षोभक वक्तव्य केल्यास अटक करण्यात येईल, ’असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
उत्तर नागपुरातील बुद्धपार्क मैदान येथे सायंकाळी वाजता सभा होणार आहे. ओवेसी यांच्या सभेला शिवसेनेसह बजरंगदल विहिपनेही विरोध दर्शवला. त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी प्रभारी शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश हरडे, किशोर कुमेरिया यांनी सहपोलिस आयुक्त अनुपकुमार सिंह यांच्याकडे केली.बजरंगदलाचे विदर्भ प्रदेश संयोजक देवेश मिश्रा, विहिंपचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष अजय निलदावार यांनीही ओवेसींच्या सभेला परवानगी देऊ नये, असे निवेदन दिले.