आंधळगावात महिलांची पाण्यासाठी  भटकंती

0
40
● महिलांचा संघर्ष आजही कायम
●आंधळगावात तीव्र पाणीटंचाई : क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
(नितीन लिल्हारे)
मोहाडी,दि.27 : तालुक्यातील आंधळगाव गावात मागील कित्येक वर्षांपासून दरवर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. गतवर्षी पावसाळ्यात तालुक्यात पावसाची समाधानकारक नोंद झाल्याने यंदा पाणीटंचाईने लवकरच डोके वर काढले आहे. मात्र यंदा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातच सुर्य आग ओकू लागल्याने व वाढलेले तापमान, भुजल पातळीत होणारी घट, तापमानामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन परिणामी कोरडे होणारे जलस्त्रोत, यामुळे आंधळगावात पाणीटंचाईची तिव्रता वाढली आहे.
२०११ च्या जनगणने नुसार आंधळगावाची लोकसंख्या सहा हजारच्या वर आहे. यागावात पाणी पुरवठा योजनेअंतर्गत २ लाख व १ लाख २५ हजार लिटरचे असे दोन मोठ मोठे पाण्याची टाकी आहेत. आंधळगावात पाणी टंचाई हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला आहे, गावाच्या काना कोपऱ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथील सरपंच मोहिनी अश्विन गोंडाने यांच्या निष्काळजी मूळे पाण्याची समस्या उद् भवत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. येथील सुभाष प्रभाग क्रमांक ३ मध्ये पाण्याची भीषण समस्या असून महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.
नदी, नाले, तलाव किनाऱ्यावर वसलेल्या आंधळगाव शहरात पाण्याची समस्या आहे असे सांगितल्यास कोणालाही आश्चर्य वाटेल. हे येथील ग्रामपंचायत सरपंच  मोहिनी अश्विन गोंडाने यांनी खरे करुन दाखविले आहे. पावसाचे दिवस असल्याने तसेच बावणथंडी, नागठाणा तलाव व नाल्याचे पाणी वाहत असल्याने परिसरात पाण्याचा दुरुपयोग होत आहे. परंतु ग्रामपंचायत सरपंचाच्या ढिसाळ कारभाराने आंधळगाव शहरातील अनेक वॉर्डात उन्हाळ्यात जाणवेल अशी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कुलरचा वापर होते त्यामुळे पाण्याचा वापरही कित्येक पटीने वाढतो. त्यामुळे ग्रामपंचायत व प्रशासन पाणी वाटप करण्यात कमी पडतो. परंतु पावसाचे दिवस सुरू असतांना व पाणी परिसरात बेवारस वाहत असतांना ग्रामपंचायतचे नियोजन शुन्य आहे. शहरातील अनेक नळावर दुगंर्धीयुक्त पाणी वाहत असते. त्यामुळे क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे, त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी दारोदार भटकावे लागत आहे. आंधळगावात हातपंप असून ते नादुरुस्त आहे.
खाजगी किंवा सार्वजनिक नळ हे शोभेल इतक्याच मर्यादित आहे, सुभाष वार्ड क्रमांक ३ मध्ये खूपच पाण्याची समस्या बिकट झाली आहे. यावेळी आजी माजी व पदाधिकाऱ्यावर  महिलांनी चांगलाच रोष व्यक्त केल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत केवळ काही मिनिटे पाणी सोडण्यात येते त्यातच नळांना येणाºया पाणीच्या धार कमी असते. कुणाला २ गुंड तर कुणाला थेंबभरही पाणी मिळत नाही. घराघरात टिल्लू पंम्पाचा वापर करून मोजक्याच लोकांना पाणी मिळतो बाकीच्याना इकडे तिकडे हातपाय मारावे लागत आहे.
आंधळगावाला पिण्याचे पाणी देण्यासाठी लाखो लिटर पाण्याची क्षमता असलेल्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत गावकऱ्यांची तहान भागविली जाते. गाव परिसरात पाण्याचे स्त्रोत कमी असल्यामुळे ती हजारो लिटर पाण्याची टाकी भरण्यासाठी काही दिवस लागतात. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळू शकत नाही. गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर शासनाचे बंधारे बांधून सुध्दा एकाही बंधाऱ्याजवळ थेंबभर पाणी साठवण न केल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण होत आहे. लाखो रुपये खर्चून हे बंधारे बांधले, पण आता ते शोभेच्या वास्तु ठरले आहेत. सार्वजनिक पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्यांची डागडुजी कडून पाणी कसे साठविता येईल याचा नियोजनबध्द आराखडा तयार करून पाणी अडविण्याची सुविधा केली पाहिजे. पाणी अडविल्याने पाण्याची पातळी उंचावेल व पाण्याची समस्या दूर होईल. ग्रामपंचायत सरपंच व पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष देवून पाणी समस्या दूर करावी नाहीतर आंदोलन करण्यात येईल अशा इशारा श्याम कांबळे राष्ट्रवादी युवा जिल्हा सचिव, रामप्रसाद बांडेबूचे, संजय दहेकर, अरुण वणवे, विजू बिरोले, आकाश बोन्द्रे व गावकऱ्यांनी केली आहे.