राणू रहागंडालेच्या शेतीच्या क्षेत्रातील भरारीने जिल्ह्यात स्ट्राबेरीला संजीवनी

0
18

जागतिक महिला दिन विशेष
खेमेंद्र कटरे
गोंदिया-इंजिनियरिंग,मेडिकल qकवा अन्य व्यवसायिक अभ्यासक्रमात पदवी मिळाली की चांगल्या पगाराची नोकरी लागावी अशीच अनेकांची इच्छा असते.qकबहुना भरपूर पगाराची नोकरी हे एक ध्येय ठेवूनच कित्येक जण महाविद्यालयीन शिक्षण घेत असतात.परंतु,उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी धडपड न करता वेगळी वाट चोखाळणारे तरुण समाजाला नवी दिशा देऊन जातात.गेल्या काही वर्षात गोंदियातील एका उच्च शिक्षित तरुणीनेही असाच आगळा ध्यास घेतला आहे.शेती हा तोट्याच्या व्यवसाय आहे,अशी भावना विदर्भातील शेतकèयांमध्ये रुजत असतानाच फायद्याची शेती करणारी तरुणी गोंदिया जिल्ह्यातच नव्हे तर शेजारच्या जिल्ह्यातही कौतुकाचा विषय ठरली आहे.राणू हंसराज रहागंडाले असे या प्रगत शेतकरी तरुणीचे नाव आहे.
आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने पुढे येऊ लागल्या आहेत.त्यातच महाराष्ट्रातील महाबळेश्वरच्या भागात पिकणारी स्टाब्रेरी गोंदियासारख्या भागात पिकवून अभियाqत्रकीच्या इलेक्ट्रानिक्स शाखेची पदवी घेऊन शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरातून सिद्ध करणारी महिला म्हणून आज कु. राणू रहागंडाले यांची ओळख झाली आहे.
इलेक्ट्रानिक्समध्ये इंजिनियरींग आणि एमबीए असं शिक्षण घेतल्यानंतर पुण्या-मुंबईची वाट धरण्याएैवजी ती सरळ घरच्या शेतात दाखल झाली.वडील करत असलेल्या पारंपारिक शेतीच्या पद्धतीत तिने बदल केले आणि अल्प काळातच त्यात यशही मिळाले.गोंदियापासून पंधराकिलोमीटरवर असलेल्या मोरवाही गावात रहागंडाले यांची शेती आहे.याच शेतात राणूने धानाबरोबरच ,टोमॅटो,मिरची,शिमला मिरची,पपई अशा फळांचे उत्पादन घेणे सुरू केले.दीर्घ कालमर्यादेची पिके घेण्यापेक्षा सिजनेबल शेती करणे फायदेशीर ठरते,हे राणूच्या लक्षात आले.त्यानुसार पीक रचना करीत ती भरघोष उत्पादन घेऊन लागली.त्यांच्या या कार्याची दखल घेत कृषी विभागाने तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट महिला शेतकरी म्हणून गौरावान्वितही केले.
रोख पिकांच्या प्रयोगात यश मिळाल्यानंतर काही तरी वेगळ करावं,असा विचार करून रहांगडाले यांनी स्ट्राबेरी लावण्याचे निश्चित केले.परंतु,गोंदियातील उष्ण वातावरण स्ट्राबेरीला मानवेल किंवा नाही याबाबत मनात साशंकता होती.बराच अभ्यास केल्यानंतर ऑक्टोंबर ते फेबुवारी महिन्यात गोंदिया जिल्ह्यात वातावरण थंड असते,त्यामुळे या कालावधीत उत्पादन घेता येऊ शकते हे लक्षात आल्यानंतर गेल्या प्रथम स्ट्राबेरीची लागवड १ एकर शेतीमध्ये केली.एक एकरातून तब्बल ३ लाखाचे उत्पादन त्यांना मिळाले.गेल्या वर्षीचा अनुभवाच्या बळावर पुन्हा यावर्षी पुन्हा एका एकरात लागवड केली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मिळालेले पिकाचे उत्पादन चांगले राहिल्याने ५ लाखाच्यावर उत्पादन मिळण्याची आशा राणू रहागंडाले यांनी व्यक्त केली.गोंदियाच्या बाजारासह बालाघाट,रायपूरच्या बाजारात दिसणारी स्ट्राबेरी सुध्दा राणू यांच्या शेतातील आहे.त्यांच्या या प्रयोगाकडे बघून अनेकांनी गोंदिया जिल्ह्यात स्ट्राबेरीच्या शेतीसाठी पुढाकार घेतल्याचेही चित्र दिसू लागले आहे.
इतर सर्व शेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला पुढे येत असताना शेतात उभे राहण्याची जिद्द मात्र फारच थोड्यामध्ये असते.नैसर्गिक ज्ञानाला तंत्रज्ञानाची आणि अभ्यासाची जोड दिली तर शेतीच्या क्षेत्रातही क्रांती घडू शकते,असा विश्वास राणू रहांगडाले यांनी महिलांना दिला आहे.