लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी चिदंबरम यांनी प्रणव मुखर्जींना ठरवले जबाबादार

0
9

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी विद्यमान राष्ट्रपती आणि 2008-09 मध्ये अर्थमंत्री असंलेल्या प्रणव मुखर्जी यांना जबाबदार ठरवले आहे.

शनिवारी पत्रकारांशी बोलताना चिदंबरम म्हणाले की, आमच्या सरकारने 2008-09 मध्ये आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जे पॅकेज दिले होते, त्याचा मोठा बोजा सरकारवर पडला होता. तोच आम्हाला महागात पडला. या पॅकेजमुळे वित्तीय तूट मोठ्या प्रमाणावर वाढली आणि परिणामी महागाईचा दर 14 टक्क्यांपेक्षा जास्त झाला, असेही चिदंबरम म्हणाले. चिदंबर ज्या पॅकेजबाबत बोलत आहेत त्यावेळी म्हणजे 2008-09 मध्ये प्रणव मुखर्जी युपीए सरकारमध्ये अर्थमंत्री होते. त्यावेळी संपूर्ण जगालाच आर्थिक मंदीचा मोठा फटका बसत होता.

चिदंबरम यांनी सांगितलेली कारणे
चिदंबरम म्हणाले की, ज्यावेळी सरकारनेच आर्थिक नियमांत सूट दिली आणि महागाई हाताबाहेर गेली त्यानंतर जनता नाराज होणार हे तर स्पष्टच होते. 2013 मध्ये राज्यसभेत एक भाषण करताना चिदंबरम म्हणाले होते की, एक तर वाईट आर्थिक अवस्था आणि त्यानंतर विविध देशांतर्गत समस्यांनी सगळ्यांना त्रस्त करून सोडले आहे. आम्ही वित्तीय तूट कमी करण्यास प्राधान्य देत आहोत. तसेच करंट अकाऊंटच्या तोट्यावरही लक्ष आहे. वित्तीय तूट आणि करंट अकाऊंटच्या तोट्यात होणारी वाढ यामगे कारण 2009 ते 2011 दरम्यान घेण्यात आलेले काही निर्णय आहेत.
त्यानंतर याच वर्षी चिदंबरम यांनी लोकसभेत म्हटले होते की, ज्यावेळी मी अर्थमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली त्यावेळी अत्यंत कठीण मार्ग असल्याचे मला समजले होते. वित्तीय तूटीची सीमा ओलांडली आहे. एवढेच नव्हे तर बजेटच्या अंदाजातही गडबड होती. विद्यमान अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या बजेटबाबत चिदंबरम म्हणाले की, जेटलींचे बजेट इक्विटी आणि फिस्कल कन्सोलिडेशनच्या आघाड्यांवर बिनकामाचे दिसत आहे.