मुफ्तींना विचारा ते भारतीय आहेत की नाही? RSS च्या मुखपत्रातील लेखात प्रश्न

0
6

नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ मध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यावर एका लेखाच्या माध्यमातून प्रहार केला आहे. तसेच जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीबरोबर मिळून सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपलाही खडे बोल सुनावण्यात आले आहेत. भाजपने मुफ्ती यांना विचारावे ते भारतीय आहेत की नाही, याची विचारणा करावी असे या लेखात म्हटले आहे. मुफ्ती जम्मू-काश्मीरमध्ये शांततेत निवडणुका झाल्याच्या प्रकरणी दहशतवाद्यांना श्रेय देण्यासारखी दुहेरी भूमिका ते कशी घेऊ शकतात असा सवाल या लेखात करण्यात आला आहे.
(संग्रहित छायाचित्र)

सीबीआयचे माजी संचालक जोगिंदर सिंह यांनी लिहिलेल्या ‘स्पार्किंग कंट्रोवर्सी’ या लेखात काश्मीर खोरे सोडावे लागलेल्या 3.70 लाख हिंदू आणि शीख कुटुंबांच्या संदर्भात निर्णय घेण्याबाबतच्या इच्छा शक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या लेखात सिंह यांनी लिहिले होते की, ”शपथ घेतल्यानंतर लगेचच मुफ्ती यांनी पाकिस्तान, फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांचे आभार मानत राजकीय वाद ओढावून घेतला होता. त्यामुळे काश्मीरात सत्तेत असलेल्या भाजपने पीडीपीला हा सवाल करावा की, ते भारतीय आहेत की नागी? त्यांना अशी दुहेरी भुमिका घेता येणार नाही. कारण शिकारी आणि शिकार कधीही एकत्र राहू शकत नाही.

दगडफेक करणारे फुटीरतावादी नेते मसरत आलम यांची सुटका
फुटीरतावादी नेते मसरत आलम यांची जम्मू-काश्मीर सरकारने सुटका केली आहे. हुर्रियतचे कट्टरतावादी नेते आलम यांना 2010 मध्ये काश्मीर खोऱ्यात दगडफेक केल्यानंतर अटक करण्यात आली होती. 2010 मध्ये सुमारे चार महिने दगडफेकीच्या घटना सुरू होत्या. त्यात सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाला होता. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद म्हणाले की, ज्या राजकीय कैद्यांच्या विरोघात गंभीर गुन्हे नसतील त्यांची सुटका केली जाईल.

सुटकेमुळे भाजप नाराज
पीडीपीच्या एकापाठोपाठ एक समोर येणाऱ्या सलग वादग्रस्त निर्णयांमुळे भाजपमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अशा स्थितीत आघाडी सरकार चालणे अवघड असल्याचे जम्मूचे आमदार रविंदर रैना म्हणाले.