25.7 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home Featured News शिक्षक साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरवात

शिक्षक साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरवात

0
31

गोंदिया,दि.21 :येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या सभागृहात आज शनिवार(दि.२१)पासून सुरु झालेल्या आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाची सुरवात सकाळी ग्रंथदिंडीने करण्यात आली.ही गं्रथqदडी निर्मल शाळेच्या परिसरातून सुरु करुन रामनगर परिसरातील मुख्य रस्तांनी भ्रमंती करीत नमाद महाविद्यालयाच्या कार्यक्रमस्थळी पोचली.या ग्रंथदिडींची सुरवात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी शिक्षक भारतीचे उपाध्यक्ष राजेंद्र झाडे,गोंदिया जिल्हाध्यक्ष महेंद्र सोननावे,बाबा जागंळे कमलबापू बहेकार,भाऊराव पत्रे, व्ही.डी.मेश्राम,प्रकाश ब्राम्हणकर,मुंबईचे जयवंत पाटील,संजय खेडीकर,लोककवी अरुण म्हात्रे,टी.एस.गौतम,भारत रेहपाडे,रजिया बेग,यशोदरा सोनवाने,छाया कोसरकर,पी.एफ.बघेले आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.या ग्रंथदिडींत सैनिक शाळेसह,निर्मल शाळा व इतर शाळेचे विद्यार्थी शिक्षक सहभागी झालेले होते.