अनिल काकोडकरांचा मुंबई IIT तून राजीनामा

0
9

मुंबई, दि. १८ – ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी मुंबई आयआयटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आयआयटीच्या संचालकपदाच्या नियुक्तीवरुन काकोडकर यांचे केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याच्या मंत्री स्मृती इराणींशी मतभेद झाले होते व यामुळेच त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

आयआयटी पाटणा, भुवनेश्वर आणि रोपड या तीन केंद्रांच्या संचालकपदाच्या निवडीवरुन अनिल काकोडकर आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. या संचालकपदाच्या निवड करणा-या सर्च अँड सिलेक्शन कमिटीमध्ये इराणी व काकोडकर हे सदस्य आहे. या समितीची बैठक २२ मार्च रोजी होणार असून या पदासाठी एकूण ३७ उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. या निवड प्रक्रियेवरुन काकोडकर आणि इराणी यांच्यात मतभेद झाले होते. या पार्श्वभूमीवर अनिल काकोडकर यांनी मुंबई आयआयटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मी राजीनामा देतोय कारण मला पुढे जायचे असे अनिल काकोडकर यांनी म्हटले आहे.