प्रतापराव पवार यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर

0
17

पुणे : पुण्यभूषण फाउंडेशनचा यंदाचा “पुण्यभूषण पुरस्कार‘ ‘सकाळ‘चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना जाहीर झाला आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी सोमवारी या पुरस्काराची घोषणा केली. नांगराच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजीची प्रतिकृती व एक लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच विशेष समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

सामाजिक, पत्रकारिता; तसेच उद्योग क्षेत्रात गेल्या सुमारे चाळीस वर्षांपासून पवार कार्यरत आहेत. त्यांना गेल्या वर्षी ‘पद्मश्री‘ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. इंडियन न्यूज पेपर सोसायटीचे अध्यक्षपद; तसेच वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्सचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती.