शिर्डी | दि. २३ प्रतिनिधी शिर्डीतही साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाने साईभक्तांसाठी तिरूपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर आता पेड दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या माध्यमातून सर्वसामान्य भाविकांना शिफारशी शिवाय व्हिआयपींच्या रांगेतून साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे. दर्शनासाठी १००, काकड आरतीसाठी ५००, तर अन्य आरत्यांसाठी ३०० रूपये भरून सर्वसामान्य नागरिकांना साईबाबांचे दर्शन घेणे शक्य झाले आहे. येत्या १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. सामान्य भाविकांना लवकरात लवकर दर्शन घेता यावे, यासाठी ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही संस्थानच्या विश्वस्तांकडून सांगण्यात आली आहे.