
मुंबई – महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी राज्यातल्या निराधार बालकांची आकडेवारी राज्य सरकारकडे नसल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.
विद्या ठाकूर यांनी ही माहिती विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली आहे. राज्यातल्या निराधार बालकांची आकडेवारी राज्य सरकारकडे नाही. राज्यातील एनजीओद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनाथाश्रमात नक्की किती विद्यार्थी आहेत, याची माहिती नसल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या या उत्तराने सरकार अनाथ विद्यार्थ्यांबाबत किती गंभीर आहे, यावर आता चर्चा सुरू झाली आहे