पिंपरीत राष्ट्रवादी, शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
7

पुणे – भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवड महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविण्याच्या उद्देशाने अन्य राजकीय पक्षांना आतापासूनच खिंडार पाडण्यास सुरूवात केली असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दुसर्‍या फळीतील काही आजी व माजी पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये माजी उमपहापौर, माजी स्थायी समिती सभापती व माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

बांधकाम कामगारांना धनादेशाचे वाटप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आजी व माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी उपमहापौर व स्थायी समितीच्या अध्यक्षा माई ढोरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके, राजू लोखंडे, संजय गांधी निरधार योजना समितीचे अध्यक्ष गोपाळ माळेकर, विद्यापीठ प्रतिनिधी शिवाजी खुळे, गणेश नखाते, अनिल नखाते, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार अभय नरवडेकर, उपाध्यक्ष विठ्ठल भोईर तर शिवसेनेचे माजी नगरसेवक कुमार जाधव, भारतीय विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाप्रमुख अजित रायकर, थेरगाव विभागप्रमुख कैलास बारणे, सुरेश वाडकर, संदिप सुर्वे, सचिन गुंजाळ, गणेश झांबरे, उपविभागप्रमुख संजय शेंडगे यांच्यासह या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.