25.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home Featured News महिला आयोगाला हवेत सक्षमीकरणावरील लघुपट

महिला आयोगाला हवेत सक्षमीकरणावरील लघुपट

0
53

मुंबई (दि. 12 जून) :   महिला सक्षमीकरणावर आधारलेल्या लघुपट (शाॅर्ट फिल्म्स) पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला आय़ोग करीत आहेत. आयोगाच्या विविध कार्यक्रमांमध्ये, उपक्रमांमध्ये निवडक लघुपट दाखविण्याचा हेतू आहे. राज्य महिला आयोगाकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राज्यभर नियमितपणे केले जात असतात. अशा कार्यक्रमांप्रसंगी
आयोगाच्या कामकाजाची माहिती देणारया व्हिडिओजबरोबरच महिला सक्षमीकरणाच्या प्रेरणा देणारे लघुपटही दाखविण्याची आयोगाची इच्छा आहे. त्याकरिता लघुपट निर्माते, दिग्दर्शक यांना त्या पाठविण्याचे आवाहन आयोग करीत आहे. लघुपट कमाल पंधरा मिनिटांचा असावा, तो प्रामुख्याने मराठी भाषेतूनच हवा. निवडक लघुपटांच्या निर्माते, दिग्दर्शकांना आयोगाकडून प्रशस्तिपत्रकदेण्यात
येईल. हे लघुपट [email protected] या इ- मेलवर १५ जून २०१९ पर्यंत पाठविण्यात यावेत.

अधिक माहितीसाठी : ९८१९५४७९११