दिल्लीत होणार पुन्हा निवडणूक

0
15

नवी दिल्ली -दिल्ली विधानसभा बरखास्त करण्याची नायब राज्यपाल नजीब जंग यांची शिफारस राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजूर केली आहे. राष्ट्रपतींनी नायब राज्यपालांचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे विचारार्थ पाठवला असून या प्रस्तावावर आजच निर्णयाची अपेक्षा आहे.

दिल्लीतील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत नजीब जंग यांनी राष्ट्रपतींकडे आपला अहवाल सुपूर्द केला. ‘दिल्लीत कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्यास तयार नाही. आपलं सर्वच पक्षांच्या नेत्यांशी बोलणं झालं आहे. त्यात सर्वांनाच पुन्हा निवडणुका हव्या आहेत’, असे स्पष्ट झाल्याचे राज्यपालांनी या अहवालात नमूद केलं आहे. राज्यपालांनी अहवालात दिल्लीत पुन्हा निवडणुका घेण्याची शिफारस केली होती. ती राष्ट्रपतींनी मंजूर केल्याची माहिती मिळत आहे. यापार्श्वभूमीवर जर दिल्ली विधानसभा बरखास्त करण्यात आली तर २५ नोव्हेंबर रोजी दिल्लीत ३ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुका रद्द होण्याची शक्यता आहे.