गोंदिया- एकीकडे केंद्रसरकारसह राज्यसरकार नागरिकांना आरोग्याच्या उत्तमोत्तम सेवा पुरविण्यासाठी पाण्यासारखा निधी खर्च करीत असताना शासकीय रुग्णालयात काम करणाèया काही स्वार्थी प्रवृत्तीमुळे रुग्णांच्या जिविताशी खेळ होत असल्याची प्रकरणे माहिती अधिकारातून समोर आली आहे. गोंदियाच्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणा-या रुग्णांना शस्त्रक्रिया व उपचार शक्य नसल्याची भीती दाखवून त्यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा रस्ता दाखविला जातो. अशा प्रकारे रेफर करण्यात आलेल्या रुग्णांना नंतर स्थानिक खासगी रुग्णालयात पाठवून संबंधित त्याच वैद्यकीय अधिकाèयाने रुग्णावर स्वतःच शस्त्रक्रिया केल्याची माहिती आरटीआयच्या माध्यमातून समोर आली आहे. उल्लेखनीय म्हणजे याप्रकरणी महिला रुग्णालयात प्रदीर्घ काळापासून टिकून असलेले डॉ. केंद्रे आघाडीवर असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे डॉ. केंद्रे यांनी आपले गैरप्रकार लपविण्यासाठी शहरातील काही नामांकित मंडळींना हाताशी धरले आहे.
- महिला रुग्णालयातील डॉक्टरांचा प्रताप
- जीएमसीच्या नावावर केली जाते खासगी रुग्णालयात प्रसूती
- ८ महिन्यात ७८ महिलांची प्रसूती खासगी रुग्णालयात
गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त आदिवासीबहुल जिल्हा आहे. राज्यात बालमृत्यूचे प्रमाण दर हजारी २७ असताना गोंदिया जिल्ह्यात मात्र हे प्रमाण दर हजारी ३०.६५ एवढे आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये २८४ बालके दगावली आहेत. जिल्ह्यात २३९ उपकेंद्र, ४० प्राथमिक आरोग्य केंद्र, ११ ग्रामीण रुग्णालय, एक उपजिल्हा रुग्णालय, एक जिल्हा सामान्य रुग्णालय व एक महिला जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. दरवर्षी सुमारे २० हजारावर महिलांची प्रसूती जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये होते. यातील सर्वाधिक प्रसूती बाई गंगाबाई जिल्हा सामान्य रुग्णालयात होते. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या काळात ९ हजार ३५६ महिलांच्या प्रसूती करण्यात आल्या. त्यापैकी ९ हजार २६६ बालके जिवंत आहेत. १६३ महिलांच्या पोटातच बाळ मृत झाले. या सहा महिन्याच्या काळात जन्मलेल्या ८३ बालकांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत बालकांपैकी ०ते १वर्षे वयोगटात २४६ तर १ते ६ वर्ष वयोगटातील ३८ बालकांचा समावेश आहे.
सहा महिन्यांत दगावले २८४ बालक
शासन महिलांच्या पोटातील बाळ सुदृढ असावे, यासाठी पोषक आहार पुरविते. मात्र, या पोषक आहाराचा लाभ त्या महिलांना होताना दिसत नाही. परिणामी, सद्यःस्थितीत गोंदिया जिल्ह्यातील ८ हजार ३८४ बालके कुपोषित आहेत. जिल्ह्यात वाढणारे कुपोषण ही तीव्र समस्या आहे. यात १ हजार ४४१ अतितीव्र, ६ हजार ९४३ बालके कमी वजनाची आहेत. ८ हजार ३८४ बालकांचा कुपोषित पोषक आहार दिला जातो जनावरांना? गर्भवती महिलांना देण्यात येणारा पोषक आहार माता व बालकांच्या आरोग्यासाठी लाभदायी आहे. परंतु, त्या पोषक आहाराला चव नसल्याचे सांगून ग्रामीण भागातील महिला त्या पोषक आहाराला जनावरांपुढे मांडत असल्याची माहिती चक्क आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनाच मिळाली आहे.
जन्मल्यानंतर २४तासात ८० बालके दगावली, १ते ७ दिवसात १०१ बालके दगावली, ७ ते २८ दिवसात ३३बालके, १महिना ते १वर्ष या वयातील ३२बालके दगावली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या उपजत मृत्युदर २६.५५ टक्के आहे. तर माता मृत्यू दर ०.५४ टक्के आहे. जिल्ह्यातील २३९ उपकेंद्रांमध्ये २ हजार ८२४ प्रसूती, तर ४० प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १ हजार ३६९ प्रसूती झाल्या आहेत. गोंदियातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात ४ हजार १०९, खासगी रुग्णालयात १हजार ७, घरगुती बाळंतपण ४७ करण्यात आले. यात ६८ बालके जुळे जन्माला आली आहेत. शासनाने माता मृत्युदर शून्यावर आणण्याचे आवाहन केले असले तरी जिल्ह्यात ६ महिन्यात पाच मातांचा मृत्यू झालेला आहे. राज्य शासन बालमृत्यू दर कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र, बालमृत्युची आकडेवारी कमी होण्याऐवजी सतत वाढत आहे. बालमृत्युचा आकडा हा बाई गंगाबाई रुग्णालयामध्येच अधिक असून येथील जे डॉक्टर प्रसूतीसाठी प्रसिद्ध आहेत, त्यांना अधिक डोक्यावर घेऊन येथील काही नेते,सामाजिक कार्यकर्ते व तथाकथित दलाल नाचत आहेत. त्यांच्यामुळेच काही डॉक्टर हलगर्जीपणा बाळगत काम करतात आणि प्रसूतीसाठी आलेल्यांच्या कुटुंबीयांनी पैसे दिले नाही तर प्रसूती बिकट असल्याचा धाक दाखवून त्यांना खासगी रुग्णालयाचा रस्ता दाखवून हे डॉक्टर आपले खिसे भरण्याचा धंदा या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात थाटून बसेलत यात शंकाच उरली नाही.