29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home Featured News पारदर्शक लोकशाही साठी मतदान जागृती तरुण पिढीचे कर्तव्य-डॉ. केशव वाळके

पारदर्शक लोकशाही साठी मतदान जागृती तरुण पिढीचे कर्तव्य-डॉ. केशव वाळके

0
32

रामटेक,दि.19ः-नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालय रामटेक, विभागीय प्रशासन रामटेक महा. शासन आणि राष्ट्रीय सेवा योजना नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनाक 17 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान जागृती साठी “लोकशाहीचा जागर” या विषयावर विद्यापीठ स्तरीय नाट्य स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत विद्यापीठातील विविध महाविद्यालयातून आणि गोंदिया, भंडारा, नागपूर जिल्ह्यातून आलेल्या साधारण 130 विद्यार्थ्यांनी उत्सुर्त सहभाग घेतला.

पहिल्यांदाच झालेल्या अशा भव्य नाट्य स्पर्धेच्या उपक्रमात विविध महाविद्यालयांकडून आलेल्या विद्यार्थ्यांनी १२ नाट्य सादर केले. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर  (दीक्षाभूमी) महा. नागपूर यांनी प्रथम क्रमांक तर  नरेंद्र तिडके महा. रामटेक यांना द्वितीय क्रमांक आणि ताई गोळवलकर महा. रामटेक यांनी तिसरा क्रमांक पटकाविला.  या शिवाय धनवटे महा. नागपूर, रविकांत रागीट महा. रामटेक, एस. एन. मोर महा. तुमसर यांना प्रत्येकी एक आणि दयानंद आर्य महा. नागपूर यांना समूह आणि एकल अशी दोन प्रोत्साहन पर बक्षीस मिळाले. .

 रामटेक तालुक्याचे तहसीलदार  बाळासाहेब मस्के यांनी नाट्य स्पर्धेचे उद्घाटन करून विधानसभा निवडणुकीच्या पार्शभूमिवर मतदान जागृती च संदेश दिला. आपल्या भाषणात मतदानाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांनी संदेशवाहक म्हणून लोकशाही च्या विकासासाठी प्रयत्न करावा अशे आव्हान केले.  कार्यक्रमाला उपस्थित विशेष अतिथी यशराज फिल्म्स प्रॉडकशन्सचे संचालक यश थूल उपस्थित होते. त्यांनी स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राष्ट्रीय सेवा याजना नागपूर विद्यापीठाचे संचालक डॉ. केशव वाळके, नागपूर जिल्हा निवडणूक नोडल अधिकारी व उप कार्यपालन अधिकारी मा. राजेंद्र भुयार हे उपस्थित होते डॉ. वाळके यांनी एन. एस. एस. च्या वतीने समाजसेवेचे संदेश देत लोकशाहीच्या यशाची धुरा विद्यार्थ्यांवर असल्याने त्यांनी आपली जबाबदारी लक्षात घ्यायचे आव्हान केले. आपल्या भाषणात देशाच्या भविष्यातील चित्र उभे करत तरुण वर्गाला आठवण करून दिले की यानाऱ्या काळात जे बदल या देशात हित आहेत त्याची झळ खऱ्या अर्थाने केवळ तरुण पिढीला भोगावे लागणार आहेत कारण आज जे वयस्क आहेत त्यांचे आयुष्य संपल्यात जमा आहेत. देशातील बदलाच्या वाईट परिणाम त्यांना फार होणार नाही मात्र तरुण पिढीचे भविष्य अंधारात आहे जर त्यांनी लोकशाहीत त्यांची जबाबदारी समझुन घेतली नाही. या देशात परिवर्तनाची कास तरुण पिढीच्या हातात आहे त्यांनी लोकशाही च्या संवर्धनासाठी समाजात जनजागृती करायची गरज आहे. भुयार यांनी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून समाजात मतदानाचे महत्त्व समझून त्याचा प्रचार प्रसार करायचे आव्हान केले. मतदान जगृतीसाठी विद्यापीठ स्तरीय अशी नाट्य स्पर्धा एक पथदर्शी उपक्रम म्हणून शासनाच्या वतीने याची भरपूर प्रशंसा झाली आणि आयोजक महाविद्यालयाला पुढे अशा शासकीय कार्यक्रमासाठी प्राधान्य देण्यात येईल अशी शासनाच्या वतीने सांगण्यात आले. कार्यक्रमाला रामटेक पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बाळासाहेब यावले विशेष उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. महाविद्यालया तील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. मनोज तेलरांदे यांनी कार्यक्रमाचा आढावा घेत  अल्पावधीतच महाविद्यालया च्या वतीने हा यशस्वी कार्यक्रमासाठी घ्यायला किती मेहेनत घेतली गेली त्याची आठवण करून दिली. आपल्या उद्घाटन पर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात एस. एन. टी. महा. चे प्राचार्य डॉ. संगीता टक्कामोरे यांनी मतदानाचे महत्व सामावून सांगितले. स्पर्धेसाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील लोकांना पारदर्शक मतदानासाठी प्रोत्साहित करावे असे आव्हान केले. शेवटी सर्वांचे आभार महाविद्यालयाच्या वतीने अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व्यक्त केले.

नाट्य स्पर्धेच्या परिक्षणासाठी एन. एम.डी. महा. गोंदिया वरून प्रा. बबन मेश्राम तसेच कवी कालिदास विद्यापीठाचे ग्रंथपाल  दीपक कापडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. भोवते यांनी पारदर्शक मतदानासाठी शपथविधी आणि राष्ट्रगीत घेतले.मतदान जागृतीसाठी विद्यापीठ स्तरीय नाट्य स्पर्धेचे संपूर्ण आयोजन आणि कार्यक्रमाचे संचालन डॉ. श्रीकांत भोवते यांनी केले आणि विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून जनजागृतीचे आव्हान केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विविध समित्यांवर महाविद्यालयाच्या प्रा. कल्पना पटेल, प्रा. अमरीश ठाकरे, प्रा. स्वप्नील मनघें, प्रा.नरेश अंबिलकर प्रा. सुभाष सेलोकार  गजनंद रेवातकर, प्रा. सुनील कठाने,, प्रा. बाळासाहेब लाड प्रा. नितीन घमंडी, प्रा. उमेश घोनमोड, डॉ. मृदुला नंदी, डॉ. महेंद्र लोधी, प्रा. सरिता सिंग, प्रा. रुपेश हतगाये, प्रा. झुल्सी वाघमारे, प्रा गणेश मराठे, माझी विद्यार्थी  संजय बोरकर आणि  जयेंद्र वासनिक इत्यादींनी घेतली