25.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home Featured News सत्तेच्या हव्याशापोटी कुठे नेऊन ठेवला पुरोगामी महाराष्ट्र माझा?

सत्तेच्या हव्याशापोटी कुठे नेऊन ठेवला पुरोगामी महाराष्ट्र माझा?

0
28

राज्यात विधान सभेचा निवडणूक निकाल लागून एक महिण्याचा काळ लोटला असून निकाल त्रिशुंक लागल्याने कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे नवीन सरकार स्थापनेचा मुहूर्त मिळेना परंत दि.२३ नोव्हे. शुक्रवारच्या रात्री मात्र भाजप ने चाणक्य निती वापरुन शनिवारी भल्या पहाटे आकस्मिकपणे राज्यपालांनी राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवून सकाळी आठ वाजताच्या मुहर्तावर भाजपाचे देवेंन्द्र फडणविस यांना मुख्यमंत्र्याची व राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्र्याची शपथ देऊन राज्यातील जनतेला अचंबीत करुन इतिहास केले.या राजकीय सत्तेच्या लालसेच्या लढाईत मात्र जो शेतकरी अवकाळी पावसाने मेठाकुळीस आला त्याकडे लक्ष द्यायला भल्या सकाळी शपथविधी देणारे व रात्रीला राष्ट्रपती हटविणार्या राज्यपाल व केंद्रसरकारला दिसला नाही.यावरुनच सत्तापिपासू नेत्यांना आत्ता पुरोगामी महाराष्ट्राच्या जनतेनेच धडा शिकवण्याची वेळ आली आहे.

या सर्व प्रकरणाने जनतेला हसावे की रडावे हेच कळेना. सत्तेसाठी हापापलेले नेतृत्व भविष्यात जनतेचा काय विकास करणार हे एक कोडेच आहे? भारत पाकिस्तान क्रिकेट सामना पेक्षाही राज्यातील नागरिकांचे पहिल्यांदाच राजकीय बातम्यामध्ये लक्ष वेधले गेले आहे एकूणच भारतीय राजकारण भविष्यात कसे राहील याची एक प्रकारे चाचणी चालू आहे असे वाटते फक्त एकच चर्चा सरकारचे काय होणार आहे. एकूणच कोणताही पक्ष दुसर्‍या पक्षांवर विश्‍वास ठेवू शकत नाही पक्षांचे कार्यकर्ते यांची मनस्थिती ही तर केवीलवाणी पाहण्यासारखी व विचार करावी अशी आहे. आपला नेता नेमके कोणासोबत आहे याची खात्री देता येत नाही. ज्यासाठी गावपातळीवर विरोध केला आहे. आज त्यांच्याच सोबत घेऊन नेते दिसतात या राजकीय समुद्रमंथन मधून काय निघेल हे सांगता येत नाही. पण याचे दूरगामी परिणाम संपुर्ण राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्वच स्तरावर पडणार हे मात्र नक्की.

राजकारणाच्या त्याच त्या बातम्या दाखविणार्या वृत्तवाहिन्यांनाही आर्थिक डबघाईल आलेल्या शेतकर्याचे प्रश्न दिसेनासे झाले आहेत. शेतकरी प्रश्न ,राज्यातील विविध प्रकारच्या अडचणी या सर्व संपल्या की काय हा प्रश्नच नव्हता अशी पार्श्‍वभूमी निर्माण झाली आहे. फक्त दिवसभर कोणताही न्यूज चॅनेल्स वर फक्त महाराष्ट्र सरकार संदर्भात चर्चा सुरू.या करिता भविष्यात मतदार राजाला मतदान करतांना ह्या सत्ता पिपासू राजकीय नेत्यापासून सावध राहून आपले मतदानाचे हक्क बजावणे गरजेचे आहे, एवढेच सांगावेसे वाटते. धन्य तो पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र मतदार राजाला मतदान करतांना ह्या सत्ता पिपासु राजकीय राजकीय नेत्यापासुन सावध राहुन आपले मतदानाचे हक्क बजावणे गरजेचे आहे एवढेच सांगावेसे वाटते.

blank