सत्तेत येताच नानाभाऊं ना धान उत्पादकांचा विसर

0
20
वाढदिवसाच्या शुभेच्छा

सुरेश भदाडे
गोंदिया- विरोधी पक्षात असताना गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या रस्त्यावर उतरून सरकारला शिव्यांची लाखोळी वाहत धान उत्पादक शेतकèयांचे शुभqचतक म्हणून मिरविणारे नवनिर्वाचित खासदार नानाभाऊ पटोले यांना सत्तेत येताच धान उत्पादक शेतक-यांचा विसर पडल्याचे चित्र सध्या दोन्ही जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. धान उत्पादक शेतकरी संकटात असताना नानाभाऊ मात्र सत्कार समारंभात गुंतल्याने शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार असताना नानाभाऊ पटोले हे स्वतःला धानउत्पादक शेतकèयांचे हितचिंतक असल्याचे भासवत सरकार विरोधी आंदोलने करायचे. शेतकèयांचे मोठमोठे मोर्चे काढून शेतकèयांच्या धानाला भाव मिळावा, यासाठी संघर्ष करताना येथील बळिराजांनी पाहिले. अनेकवेळा त्यांच्या मोच्र्यात शेतकèयांना पोलिसांच्या लाठ्यांचा चांगलाच प्रसादही ग्रहण करावा लागला. qसचनाचा प्रश्न असो की धानाला भाव मिळण्याचा प्रश्न असो, नानाभाऊ नेहमी या विषयी टोकाची भूमिका घेत आपले राजकारण करायचे. यामुळे नानाभाऊ शेतकèयाचे लाडके सुद्धा झाले. यामुळे ते भंडारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे वजनदार नेते प्रफुल पटेल यांना पराभूत करण्याएवढे मोठे झाले. तिरोडा येथील अदानी प्रकल्पावर त्यांनी अनेकवेळा चांगलेच तोंडसुख घेतले. मात्र, सत्तेत येताच त्याच अदानी समूहाला ३५० एकर जमीन देऊन टाकली. सध्या शेतकèयांच्या हातात पीक आले आहे. अवकाळी पावसाने काही ठिकाणी नुकसान केले. शेतकèयांनी उत्पादित केलेला धान खरेदीसाठी अद्यापही केंद्र सुरू करण्यात आले नाही. परिणामी, व्यापारी शेतकèयांची लूट करीत आहेत. खरेदी केंद्रे वेळेवर सुरू झाली नाहीत, तर शेतकèयांपुढे फार मोठे संकट उभे राहून शेतकरी कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकीपूर्वी याच विषयावर नानाभाऊ मोठमोठे मोर्चे काढायचे. आता त्यांचे सरकार असताना नानाभाऊंनी एकदाही शेतकèयांना त्याचे हित जपण्याविषयी तोंडातून ‘ब्र‘ देखील काढला नाही. याउलट निवडणूक जिंकून आल्याने व त्यांच्या पक्षाला सत्ताप्राप्ती झाल्याने त्याचा विजयोत्सव साजरा करण्यात नानाभाऊ व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत.
गोंदिया भंडारा जिल्ह्यात पक्षाच्या स्थानिक आमदाराच्या मदतीने सत्कार समारंभ आयोजित करून उधळपट्टी करण्यावर नानाभाऊंचा भर आहे. यामुळे नानाभाऊंच्या पक्षाचे सरकार आल्याने शेतकèयांचे सारे प्रश्न सुटले, असे तर नसावे ना? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे. आपल्याच सरकार विरुद्ध आवाज उठविणारे नेते म्हणून ओळखले जाणारे नानाभाऊ यांचा आवाज कदाचित वाड्यातील राजकारणापुढे गहाण तर झाला नाही ना, असा ही टोला त्यांचे विरोधक आता लावत आहेत.