नागपूर-राज्यातील कोट्यवधी रुपयांचे कर्ज कुठे खर्च झाले आणि हा निधी कुठे गेला, हे तपासण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचा विचार सुरू आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी सांगितले. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच चंद्रपूरला जाण्यासाठी मुनगंटीवार नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. अर्थ खात्याची श्वेतपत्रिका जारी करण्याचे संकेत देऊन त्यांनी आघाडी सरकारची तिजोरी सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का दिला आहे.
युतीच्या काळातही महादेवराव शिवणकर यांच्याकडे अर्थखाते होते. त्यावेळीही ेशेतपत्रिका जारी करण्यात होती पण, त्याचा विशेष लाभ नाही. राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर आहे. पण, त्याचे रिझल्ट दिसून आलेला नाही.
हा निधी कुणाच्या घशात गेला, असा प्रश्न सर्वसामान्यांनादेखील आहे. त्यामुळे श्वेतपत्रिका जारी केल्यावर त्यात गैरव्यवहार असल्याचे स्पष्ट झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुनगंटीवार यांनी दिला. शेतकरी हवालदिल असल्याकडे लक्ष वेधले असता, शेतकèयांना मदत करण्याचे सरकारचे धोरण आहे. बजेट आणि येणा-या काळात चांगले परिणाम दिसून येतील, असा दावाही सुधीर मुनगंटीवार यांनी केला
श्वेतपत्रिका काढण्याचा विचार-अर्थमंत्री मुनगंटीवार
वाढदिवसाच्या शुभेच्छा