33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home Featured News माजी जि.प.सदस्य टेंभरेंकडून जनतेसाठी निःशुल्क पाणीटॅंकर

माजी जि.प.सदस्य टेंभरेंकडून जनतेसाठी निःशुल्क पाणीटॅंकर

0
30

गोंदिया,दि..२२: गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय टेंभरे यांनी परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यात होणार्या पाणीटंचाईची चणचण लक्षात घेत निःशुल्क पाणी पुरवठा टँकरची सोय करुन दिली आहे.या निःशुल्क पाणी टॅंकरचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य संजय टेभंरे हस्ते सरपंच चंद्रकलाताई तुरकर,उपसरपंच रामुभाऊ शरणागत, हरिलाल गराकाटे, माजी सरपंच हिरालाल टेभंरे,टिकेशवरीताई पटले, बंसतीताई राऊत,टिकाराम टेंभरे,रुपचंद शरणागत, जिवराज शरणागत, सुनिल तुरकर, देवनाथ येलसरे, भाऊलाल कोसरे, यवकराम राहंगडाले, दिनेश दिहारी, तुलाराम दिहारी, गौरी कुरजेकरं, प्रकाश मेश्राम, भिमराव नांगवशी, मुना पटले, गिरजाशंकर शरणागत, घनश्याम तुरकर, कुडंलिक तुरकर माधवराव देशमुख,माजी सरपंच रतनलाल बघेले,उतम भगत,भाऊलाल टेभंरे,रमेश पटले चितुंभाऊ टेंभरे आदी मान्यवर उपस्थित होते.