अंजनसिंगी,दि.22ः अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग (माध्यमिक)व जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४५ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी जगदंब पब्लिक स्कूल चांदूर बाजार येथे १९ ते २१जानेवारी २०२० या कालावधीत पार पडले. यामध्ये जि. प. पूर्व माध्यमिक मराठी शाळा वाघोली ता. धामणगाव रेल्वे येथील विषय शिक्षक किशोर महादेवराव परतेकी यांच्या नाविन्यपूर्ण ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्याला शिक्षकांच्या प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याने त्यांची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनाकरीता झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी सुषमाताई मेटकर, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र गायकवाड ,तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष अनंत डुमरे, मुख्याध्यापक सुनिल कांबळेर, शिक्षक व मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे किशोर महादेवराव परतेकी हे सलग पाचव्यांदा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीकरीता अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





