32.1 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home Featured News मित्राच्या स्मृतीत रक्तदान करुन पंरपरा जोपासतात

मित्राच्या स्मृतीत रक्तदान करुन पंरपरा जोपासतात

0
83

मुरारी काबरा : भंडाराच्या रवींद्रनाथ टागोर युवा मंच तर्फे ५१ जणांनी केले रक्तदान
भंडारा : सर्व दानात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. प्रिय माणूस हे जग सोडून गेल्यावर त्यांच्या आठवणीत शोक करीत बसण्यापेक्षा त्या स्मृती सतत कायम राहाव्यात, या उदात्त हेतूने एकत्र आलेल्या युवकांच्या धडपडीने २००२ पासून रक्तदान शिबिराचे आयोजन रविंद्रनाथ टागोर युवा मंच बहुद्देशीय सांस्कृतिक क्रिडा व शैक्षणिक संस्थेच्यावतीने केले जात आहे.
सतत १९ वर्षापासून शेकडो रक्तदाते या शिबिरात सहभागी होऊ न उत्स्फूर्तेपणे रक्तदान करतात. या युवकांनी सामाजिक जाणीवेतून आपल्या लाडक्या मित्राच्या स्मृतीत रक्तदान करुन पंरपरा जोपासत आहे, असे प्रतिपादन युवा उद्योजक मुरारी काबरा यांनी केले. रविंद्रनाथ टागोर युवा मंचच्या वतीने येथील रविंद्रनाथ टागोर चौक गौरव कॉम्पलेक्समध्ये प्रकाश सव्वालाखे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सन २००१ मध्ये प्रकाश सव्वालाखे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. समाजाचे ऋण फेडण्याच्या भावनेतून आपल्या मित्राची एक आठवण म्हणून रविंद्रनाथ टागोर युवा मंच बहुउद्देशीय सांस्कृतिक, क्रीडा व शैक्षणीक संस्थातर्फे  शनिवारला रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन भंडारा अर्बन बँकेचे संचालक डॉ. जगदीश निंबार्ते यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता मुरारी काबरा होते. प्रमुख पाहुणे म्हणून भंडाराचे मनोज वंजानी, गोंविदराव चरडे, देवाशिष सोनवाने, सामान्य रुग्णालय भंडाराचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. हितेंद्र खांडेकर उपस्थित होते. दरवर्षी या शिबिराचे आयोजन केल्या जात असून वर्षभरात गरजू, थॅलेसिमिया तसेच विविध आजारातील रूग्णांना या संस्थेतर्फे रक्तपुरवठा केला जातो. सामान्य रुग्णालयातील टेक्निशियन डॉ. कैलास वलथरे, डॉ.लोकेश गोटेफोडे, रोशन चवडे, पियुष बाभरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राजू मस्के यांनी केले.
रक्तदात्यांमध्ये नगरसेवक बंटी मिश्रा, गौतम जैन, मनोज संघानी, संजय मुल, लोकेश मुटकुरे, स्वप्नील येवले, सारंग बेदरकर, शेषराव कुंभारे, भूषण मुटकुरे, हितेश ठाकरे, महेश शहारे, जितेंद्र हलमारे, संजय चौधरी, जितू मुटकूरे,  सतपाल माहुले, पूनम तिवारी, श्रीकांत आंबाडारे, नरेंद्र मुटकूरे, बंटी जैन, निलेश सव्वालाखे, प्रमोद निनावे, आकाश गंधे, शिरीष धनकर, पंकज कटकमवार, प्रशांत डोमळे, संजय सव्वालाखे, मुकेश ठाकरे, राघव सार्वे आदीचा समावेश होता.