32.1 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ निवडणूक सुधारणा व उपाय योजनेबाबत जिल्हास्तरीय चर्चासत्र संपन्न

निवडणूक सुधारणा व उपाय योजनेबाबत जिल्हास्तरीय चर्चासत्र संपन्न

0
47

गडचिरोली,दि.10:- जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांच्यावतीने जिल्हास्तर लोकशाही पंधरवडा 2020 निमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक सुधारणा व उपाय योजनेबाबत विविध वक्ते, पदाधिकारी व अधिकारी यांनी यावेळी सहभाग नोंदविला. यामध्ये चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून अजय कंकडालवार अध्यक्ष जिल्हा परिषद हे होते. चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून गडचिरोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा योगिता पिपरे उपस्थित होत्या.तसेच यावेळी पंचायत समिती सभापती गडचिरोली चामोर्शी, आरमोरी उपस्थित होते. चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून प्रा.रुपेंद्रसिह गौर, प्रा.नरेंद्र आरेकर, सुहास पाटील आदी उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रिया, अंमलबजावणी, मतदान टक्केवारी या सर्वच प्रक्रियेत सुलभता यावी या अनुषंगाने लोकशाही पंधरवडा निमित्त चर्चासत्राचे आयोजन केल्याचे उपजिल्हाधिकारी निवडणूक कल्पना निळ-ठुबे यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले. यावेळी नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यासाठी दारु व पैशाचा वापर कमी झाला पाहिजे. मतदारांनी आपल्या अमुल्य मतासाठी दारु किंवा पैशाच्या आहारी जावू नये असे मतदारांना आवाहन केले. यावेळी अध्यक्षीय भाषणात अजय कंकडालवार यांनी प्रशासन व पोलीस यांच्या संयुक्त नियोजनाचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले लोकांना निवडणूकीवेळी लोकप्रतिनीधींनी दिलेले शब्द पाळावेत. आपण ज्या आधारावर निवडणूक लढवितो. त्यावरच मतदार निवडून देतात. मग त्यांच्या अपेक्षा पुर्ण करणेही लोकप्रतिनीधींची जबाबदारी आहे. लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी ग्रामीण मतदारा सारखे शहरी मतदारांनीही घराच्या बाहेर पडने गरजेचे आहे.या कार्यक्रमासाठी विविध स्थानिक स्वराज्य संस्थाचे लोकप्रतिनीधी, शालेय विद्यार्थी,शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्र संचलन व आभार नायब तहसिलदार सुनिल चडगुलवार यांनी मानले.