संतोष रोकडे/अर्जुनी-मोर,,दि.१२.:जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय तसेच तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने 16 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता नवेगावबांध येथील हेलिपॅड पटांगणावर विधी सेवा शिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हा विधि सेवा व शासकीय योजनांची माहिती घरा पर्यंत पोहोचवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात अंशी शासकीय व निमशासकीय विभागाचे माधुरी मार्गदर्शन करणारे स्टॉल उपलब्ध राहणार आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जीवन ज्योति विमा योजना अटल पेन्शन योजना, जनधन योजना, उज्वला गॅस योजना, सहज बिजली हर घर योजना,मतदान नोंदणी नवीन आधार नोंदणी , दुरुस्ती योजना नवीन रस्ता मागणी , दुरुस्ती तसेच नवीन नाव समाविष्ट करणे इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना, आयुष्यमान भारत योजना, माता व बालसंगोपन कार्यक्रम योजना, सामाजिक आर्थिक जाती-जमातींना 2021 पशुसंवर्धन एसटी महामंडळ शेतकरी सन्मान योजना, पोलीस मित्र ,आरटीओ कार्यालयाच्या विविध योजना, बँक योजना व सेवा कृषी विभाग योजना मातृत्व संबंधी योजना, आरोग्य तपासणी व आरोग्यसेवा विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.या महामेळाव्याचे लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय तसेच तालुका विधी सेवा प्राधिकरण यांनी केली आहे




