अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.24ः- हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेली प्रतापगड यात्रा. या यात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक महादेवाच्या दर्शनासाठी येतात. भाविक जय भोले च्या गजरा सह अल्लाह चाही गजर तितक्याच श्रद्धेने करतात.
यात्रेमध्ये शासकीय विभागामार्फत विविध प्रकारच्या योजनांचे माहिती दिली जाते. शासनाचे विभाग याठिकाणी जनजागृतीचे कामे करतात.या वर्षीच्या यात्रेत स्थानिक ग्रामपंचायत मार्फत आगळावेगळा जनजागृतीचा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाची आलेल्या प्रत्येक भाविकाने स्वागत केले. पंचायत समिती अर्जुनी मोरगाव अंतर्गत ग्रामपंचायत प्रतापगड तर्फे प्लास्टिक आणि प्लास्टिक जन्य वस्तूंचे दुष्परिणाम मानवासह वन्यप्राणी आणि निसर्गाला किती घातक आहे ,याची माहीती प्रसिद्धी पत्रकातून दिली गेली.भाविकांकडील प्लास्टिक पिशवी जमा करून त्या जागी भाविकांना ग्रामपंचायत मार्फत विनामूल्य कागदी पिशवी वाटप करण्यात आली.भाविकांकडून प्लास्टिक पिशवी जमा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमास भाविकांनी साथ दिली.ही यात्रा तंबाखू मुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत जनजागृती करण्यात आली या जनजागृती चे संदेश देणारे पत्रक टी-शर्ट कागदी पिशवी यांचे विमोचन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांचे हस्ते करण्यात आले.पंचायत समिती विस्तार अधिकारी अनुप कुमार भावे यांचे मार्गदर्शनात या उपक्रमास ग्रामसेवक संजय दरवडे, सरपंच अहिल्या खोब्रागडे ,उपसरपंच तेजराम राऊत,समस्त ग्रामपंचायत सदस्ययांसह गावकऱ्यांनी सहकार्य केले.
प्रतापगड यात्रेत प्लास्टिक बंदी आणि तंबाखू बंदीचा जागर
ग्रामपंचायत प्रतापगडच्या पुढाकार





