सोशल मिडियातील पत्रकारितेलाही आता राज्य शासनाचा पुरस्कार

0
9

मुंबई दि.20:प्रगत तंत्रज्ञानामुळे नवनवी माध्यमे निर्माण झाली असून, अभिव्यक्तीसाठी सोशलमिडीया व ई-माध्यमांचा वापर मोठ्याप्रमाणावर होत आहे. हे लक्षात घेऊन राज्य शासनाकडून सोशल मिडियातील पत्रकारितेसाठी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे. 41 हजार रूपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

विकास पत्रकारितेत योगदान देणा-या मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील पत्रकारितेसाठी शासनाकडून पुरस्कार दिले जातात. त्याचप्रमाणे सोशल मिडियासाठीही पुरस्कार देण्यात येणार आहे. संकेतस्थळ व ब्लॉग या सोशल मिडियातील प्रसारित मराठी भाषेतील वृत्त व पत्रकारिताविषयक मजकुरासाठी ही स्पर्धा असून, या माध्यमांचा प्रभावी वापर करणा-या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना सहभाग घेता येईल.

स्पर्धेच्या नियमानुसार स्वतंत्र ब्लॉगद्वारे लेखन केलेले असल्यास ब्लॉगला किमान एक वर्ष पूर्ण झालेले असावे. वृत्तविषयक संकेतस्थळ हे अधिकृत असावे व सोशल मिडियाचा वापर करताना केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका या विकास पत्रकारिताविषयक लेखनाच्या असणे आवश्यक असून, त्यात शासनाच्या विविध योजनांना पूरक अभिव्यक्ती असणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर शासन निर्णय उपलब्ध आहे.