कौशल्य विकास मार्गदर्शन मेळावा

0
26

गोंदिया ता.२१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील सर्व जाती-धर्माच्या बेरोजगार युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी अभिनव मार्गदर्शन मेळावा पवार सांस्कृतिक सभागृहात घेण्यात आला. यात विविध संस्था, विविध विभागाच्या स्टॉल्सच्या माध्यमातून अनेक युवक-युवतींना आपल्या करिअरची दिशा निवडण्यासाठी मदत झाली.
यामध्ये एल अँन्ड टी कन्स्ट्रक्शन स्कील्स ट्रेनिंग इन्स्टिट्युट, ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, डिजीटल मार्केटींग ट्रेनिंग, विदर्भ डायमंड इन्स्टिट्यूट, सॉफ्ट पॉलिनॉनिअल्स प्रा.लि., डॉन बोस्को व्यवसायीक प्रशिक्षण केंद्र, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट अँन्ड रिसर्च, अँसेट एज्युकेशन एम्पॉवरमेंट इंटरप्रायजेस, अर्थटेक नॉलेज सोल्यूशन, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, अग्रणी जिल्हा बँक ऑफ इंडियाचे बँक योजना मार्गदर्शन केंद्र, महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र, अडॉर वेल्डींग अकॅडमी प्रा.लि., उमरे इन्स्टिट्यूट ऑफ कंप्युटर हार्डवेअर, हॉटेल मॅनेजमेंट अँन्ड कॅटरिंग स्कील सेंटर, कोब्रा अँडव्हेंचर अँन्ड नेचर क्लब, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सर्वशिक्षा अभियान समावेशीत शिक्षण, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, जिल्हा माहिती कार्यालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आरोगयधाम संस्था, राधाबाई बाहेकर नर्सिग स्कूल, अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती यासह ७0 स्टॉल्स या मार्गदर्शन मेळाव्यात लावण्यात आली होती.अनेक युवक-युवतींनी विविध स्टॉलला भेट देऊन त्यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रशिक्षण योजना व कर्ज योजना यांची माहिती जाणून घेतली. तसेच विविध प्रशिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घेतले.मेळाव्याला जवळपास तीन हजाराच्यावर युवक-युवतींची उपस्थिती होती.